मराठी चारोळ्या

Pages

गर्जा मराठी.....गर्जा मराठी

Thursday, January 7, 2010

मराठी....मराठी....ओरडतो मराठी
पाहतो सर्व......तरी भरडतो मराठी

आला मंत्री.....त्याला सलाम ठोकतो मराठी
लाठीमार झाला....तरी लाठी झेलातो मराठी

Mineral Water च्या बाटल्या ढोसतो मराठी
पाण्यासाठी वणवण......भटकतो मराठी

Multinational company मध्ये काम करतो मराठी
दुपारी जेवणाचे डबे.......पुरवतो मराठी

Convent School मध्ये शिकतो मराठी
महापालिकेच्या शाळेला कमी लेखतो मराठी

Branded Cloths जरी वापरतो मराठी
confidence नाही म्हणुन चाचरतो मराठी

McDonald चा बर्गर खातो मराठी
गाडीवरच्या वडापावावर राहतो मराठी

Malls ची रोषणाई बघतो मराठी
अंधारात जीवन....जगतो मराठी

कुटुंबासाठी सतत झड़तो मराठी
हक्कांसाठी आज ही लढतो मराठी.....??

हिजडयांच्या हाती सोपवलाय राज्य
आणि म्हणतो दिल्लीचे तख्त राखतो मराठी

नको रे नको......नको होवूस जागा....
गळा फाडून ओरडत रहा.....गर्जा मराठी.....गर्जा मराठी

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP