अखेरची इच्छा ...
Saturday, January 30, 2010
अखेरची इच्छा ...
मी ओठ नाही मागत तुझे..पुरतील मला सूर तू सांडलेले...
अर्थ उमगण्याची न इथे घाई...
उरतील सदा शब्द तू मांडलेले... !
तू न्यावेस तुझे रंग तुझ्यासवे...
ठेवून मागे बोट माझे रंगलेले..
ओघळतील हळव्या छटा कागदावर.
रंगविता वठले झाड खंगलेले...!
मज कैफ कसा झेपेल धुक्याचा...
आठवात तुझ्या क्षण गोठलेले....
न राहावे तुझे आभाळही मागे..
छळतील मला पंख छाटलेले...!
आता चंद्र न पुन्हा पाहीन मी..
न दिसेल चांदणे तव पदरातले..
अश्रूत भिजावे तुझ्या एकदा.
नाव माझे 'श्रध्द्धांजली' सदरातले.. !!!
0 comments:
Post a Comment