बॉस .....
Thursday, January 21, 2010
बॉस ..... | |||||
बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा... | |||||
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा... | |||||
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा... | |||||
मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून | |||||
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'... | |||||
यथावकाश माझं लग्न झालं... | |||||
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले... | |||||
बघता बघता 'अतिपरिचित' झाले.... | |||||
आणि हळूहळू पंख सैलावत जाताना | |||||
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही... | |||||
आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही... | |||||
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी | |||||
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो... | |||||
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने | |||||
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता' | |||||
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते... | |||||
उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा | |||||
उकरून उकरून काम करणे सोपे असते, | |||||
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी | |||||
गुपचुप कबुल केलेए आहे मी... | |||||
- संदिप खरे |
0 comments:
Post a Comment