सफरचंद
Thursday, January 21, 2010
सफरचंद | |||||||
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते | |||||||
करायची नसते काळजी फांदीवरचे इतर सोबती पिकल्याची-ना पिकल्याची | |||||||
करायची नसते काळजी फांदीखालील बेसावध डोक्यांची | |||||||
वेळ झाली कळताक्षणी सारा गर गोळा करून | |||||||
फांदीवरच्या फलाटावरून झाडाचे गाव सोडायचे असते | |||||||
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते | |||||||
मग ते पाहून कुणाला गुरुत्त्वाकर्षणाचा नियम सुचू देत-ना सुचू दे | |||||||
सुचल्याच्या आनंदात तेच सफरचंद कापून खाऊ देत-न खाऊ दे | |||||||
पडणाऱ्याचे नशीब वेगळे सुचणाऱ्याचे नशीब वेगळे | |||||||
सुचणाऱ्यागत पडणाऱ्याने नोबेल-बिबेल मागायचे नसते | |||||||
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते | |||||||
विचार नसतो करायचा की स्थितीज ऊर्जेची गतीज ऊर्जा कशी होते | |||||||
नसते चिंतायचे की मरणासारखे त्वरण सुद्धा अंगभूत असते | |||||||
नियम माहित असोत-नसोत नियमानुसारच सारे घडायचे असते | |||||||
जर सफरचंद असेल तर त्याने टपकायचे असते | |||||||
जर पृथ्वी असेत ते तिने ओढायचे असते | |||||||
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते | |||||||
सफरचंदालाही असतीलच की स्वप्ने, की कुणीतरी हळूवार झेलावे | |||||||
किंवा उगवावे थेट चंद्रावर, आणि मग पिसासारखे अलगद पडावे | |||||||
पण एकेक असे पिकले स्वप्न वेळीच देठाशी खुरडायचे असते | |||||||
अन् चिख्खल असो वा माती असो, दिवस असो वा रात्र असो, फळ असो वा दगड असो | |||||||
एकाच वेगात मधले अंतर तोडायचे असते | |||||||
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते |
0 comments:
Post a Comment