करु वाटे खरे तर तुला एक फोन
Thursday, January 21, 2010
करु वाटे खरे तर तुला एक फोन | |||
यावा वाटे खरे तर तुझा एक फोन | |||
असे काही होत नाही मग उगाचच | |||
याला कर फोन कधी त्याला कर फोन | |||
फोन तुझा सदा चालू कधी बंद नाही | |||
आणि त्याला तारेचाही आता बंध नाही | |||
पक्षापरी निरोपांची हवेतून ये-जा | |||
हातातून तो ही परी झेपावत नाही | |||
हातामध्ये फोन तरी प्रश्ण एवढाच | |||
बोलायचे काय आणि बोलणार कोण | |||
कसा बघ फोन माझा गावोगाव फ़िरे | |||
हातातल्या हातामध्ये एकटाच झुरे | |||
ह्रदयात साठवल्या काही जुन्या खुणा | |||
टाकवेना फोन बाई जरी झाला जुना | |||
पुन्हा पुन्हा करतो मी बटणाशी चाळा | |||
पुन्हा पुन्हा बदलतो रींगरचा टोन ! | |||
खिडकीत साधुनिया सिग्नलचा कोन | |||
कसे कसे किती किती बोलायचा फोन! | |||
आता कसा उगामुगा वरवर बोले | |||
जिभेवर जसे काही त्याच्या वारे गेले ! | |||
गोड गोड बोलायला एकटा मी पुरे | |||
भाडायला तरी सखे लागतात ना दोन ! |
0 comments:
Post a Comment