कुणीच नाही
Thursday, January 21, 2010
कुणीच नाही बोलायाला त्याच्यासाठी | |||
झुकून खाली म्हणते अंबर बोलू काही... | |||
खर्ज बोलतो मनात ठेवून तार तमाशा | |||
'मध्या'मध्ये ठेवूनिया स्वर बोलू काही... | |||
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा | |||
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही... | |||
जग बदलाची कशास करता इतुकी घाई | |||
आधी बदलू स्वतःस नंतर बोलू काही... | |||
गल्ली मध्ये बोलायाचे कारण नाही | |||
आयुष्याच्या हमरस्त्यावर बोलू काही... | |||
तुमच्या संगे आज मलाही म्हणूदे गाणे | |||
मिटवून सारे मधले अंतर बोलू काही... |
0 comments:
Post a Comment