ऋतु
Tuesday, January 19, 2010
ऋतु बदलतात
आपणही बदललो…
कधीही एकमेकांशिवाय न रहाणारे आपण
आता एकमेकांची ऒळख विचारायला लागलो
कधी स्वप्नांच्या राज्यातला तुझा वावर
आता तर तो गावही सुनाच
कधी एका स्पर्शाची भाषा बोलणारे आपण
आता इतके अनोळ्खी, की शब्दांचेही ओझे…
एकमेकांच्या उदंड आयुष्याची दुवा करणारे आपण
आता घेतल्या शपथाच तोडू लागलो…
असे बदलले दिवस …. आणि अशी बदलली नाती…
तरी…..
या ऋतुंना पुन्हा परतण्या़ची आशा
पण आपले ऋतु मात्र पुन्हा न परतण्यासाठीच
0 comments:
Post a Comment