उत्कट-बित्कट होऊ नये
Thursday, January 21, 2010
उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये.. | ||||
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये | ||||
नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार.. | ||||
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये... | ||||
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये | ||||
असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे.. | ||||
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये... | ||||
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये | ||||
शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार.. | ||||
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये... | ||||
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये | ||||
कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव.. | ||||
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये... | ||||
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये | ||||
कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ.. | ||||
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये... | ||||
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥ |
0 comments:
Post a Comment