सुविचार - ५१ ते ७५
Saturday, January 9, 2010
- ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
- ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
- ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
- ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
- ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
- ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
- ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं.
- ५८) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे
- ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
- ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
- ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र!
- ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
- ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
- ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
- ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
- ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
- ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये.
- ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
- ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
- ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
- ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
- ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
- ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
- ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
- ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
0 comments:
Post a Comment