कसे सरतील सये...
Thursday, January 21, 2010
कसे सरतील सये... | ||||
कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे | ||||
सरताना आणि सांग सलतील ना | ||||
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर | ||||
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना... | ||||
पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा | ||||
रिते रिते मन तुझे उरे | ||||
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे | ||||
खोल खोल कोण आत झुरे | ||||
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी | ||||
सोसताना सुखावुन हसशील ना, | ||||
गुलाबाची फुलं दोन... | ||||
कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम | ||||
चिडीचुप सुनसान दिवा | ||||
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच | ||||
नभातून गोरा चांदवा | ||||
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण | ||||
रोज रोज निजपर भरतील ना, | ||||
गुलाबाची फुलं दोन... | ||||
इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी | ||||
जडेसर काचभर तडा | ||||
तूचतूच तुझ्यातुझ्या तुझीतुझी तुझेतुझे | ||||
सारासारा तुझा तुझा सडा | ||||
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून | ||||
जातानाही पायभर मखमल ना, | ||||
गुलाबाची फुलं दोन... | ||||
आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे | ||||
माळूनिया अबोलीची फुले | ||||
देहभर हलू देत विजेवर झुलू देत | ||||
तुझ्या माझ्या विरहाचे झुले | ||||
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना | ||||
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना, | ||||
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर | ||||
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना... | ||||
0 comments:
Post a Comment