मराठी चारोळ्या

Pages

महाराष्ट्र तोडणा-या दलालांनो

Saturday, February 20, 2010


महाराष्ट्र तोडणा-या दलालांनो

मराठ्या तू जिवंत माणूस 
नाहीस मुके जनावर रे ,
शहाणपणा शिकवावा इतरांनी 
वेळीच मराठ्या सावर रे - १ -

बखर खोलून बाघशील का?
इतिहासपाने चाळशील का ?
संताप तुला का येईना गाड्या 
शंडासम तू जगतो का ? - २-

आठव राजे शिवछत्रपतींना 
महातेज सूर्य शंभुराजांना 
लक्ष्मीबाई ते बाजीरावांना 
सावरकर टिळक क्रांतीसिंहाना - ३- 

धमण्यामधील रक्त तुझ्या 
लाव्हा होऊन दौडु दे 
राख करून गाड गनिमा 
चौफेर मराठा उधळू दे - ४ -

दे एक नारा एकच इशारा 
अखंड राष्ट्र एक मराठा 
महाराष्ट्र तोडणा-या दलालांनो 
मुकाट आपले घर गाठा - ५ --- 

महाराष्ट्र अखंड होता आहे आणि हा मराठा इतिहास जिवंत असेपर्यंत तो आखंडच राहील . जय महाराष्ट्र!

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP