" चॉकलेट "
Saturday, February 6, 2010
" चॉकलेट "
" चॉकलेट "
बाबा मला चॉकलेट आन
अस तो रोज म्हणायचा
बाबांचा लाडाचा मुलगा म्हणुन
बाबा रोज चॉकलेट आणायचा
अभ्यासात पहिला आणि
खेलात बाजी मारायचा
चॉकलेट साठी तो
काहीही करायचा
आई कड़े रोजच्या डब्यात
चॉकलेट चा हट करायच
बाबा गुपचुप डब्यात
मग एक चॉकलेट भरायचा
पण .....
एक दिवशी तो
अचानक आजारी पडला
औषधाच्या दुकानात चॉकलेट बघून
बाबा खुप रडला
डॉक्टर म्हणाले मुलाच्या
डोक्यात गेलाय ताप
धाय मोकलून रडली आई
खाली कोसलला बाप
मग नंतर .....
डॉक्टर म्हणाले त्याची
आता स्मृति नष्ट जालीय
हाय रे देवा मुलावर
ही वेळ कशी आलीय
शुन्य दृष्टी ने मुलगा
बाबाला काही सांगत होता
बाबाला समजले कदाचित
तो चॉकलेट मागत होता
बाबांनी भरपूर दिली चॉकलेट
आणि तो खात राहिला
बाबा मात्र खिन्न पणे
मुलाकडे पाहत राहिला
रंगित फुलाचा जणू
आज रंगच ओसरला होता
फक्त चॉकलेटच लक्षात
पण .....ते देनारया बाबांना
तो विसरला होता .....
0 comments:
Post a Comment