मराठी चारोळ्या

Pages

तू सोडून गेलीस............

Saturday, February 6, 2010


तू सोडून गेलीस............ .

तू सोडून गेलीस,
आणि हरवल्या माझ्या चांदराती
पसरला सारा मिट्ट काळोख, 
उरल्या केवळ अमावस्येच्या राती............ ..

निद्रा गेली केव्हाच उडोन,
कूस बदलून मी हैराण 
स्वप्न नगरी मज तेव्हापासून
कधीच ना भेटली ,
सारे चित्र झाले वैराण............ .......

प्राजक्त मनीचा आता न फुलतो,
ना फुलते कधीच रातराणी
जरी घालतो मी रोज त्यांना,
डोळ्यांमधील आसवांचे पाणी............ .....

लोपली केव्हाच येथली ,
आनंदाची मंजुळ गाणी 
हृदयपटावर माझ्या आता ,
वाजते केवळ विराणी............ .........

सारेच आता मनाला ,
अंधारलेले भयाण क्षण 
आधार केवळ एक मनातील,
मिणमिणती तुझी आठवण............ .......
____________ _________ _________ _________ _________ __

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP