Saturday, February 6, 2010
माझ्या कवितेत आहे
माझ्या कवितेत आहे
.
माझ्या कवितेत_ आहे
वेदनेचे जन्मगीत
सांगा पाषाणास काळ्या
तया फुटेल पाझर
माझ्या कवितेत_ आहे
भोळा भाव शुद्ध न्यायी
चार घास ती वाटते
भूकेल्यांत बरोबर.
माझ्या कवितेत_ आहे
दीन भक्तांचा आक्रोश
माभा-यास देई तडे
देव येतो गं समोर
माझ्या कवितेच्या वाटे
फुका जाऊ नये कुणी
रंजल्यांशी ती हळवी
दुर्जनांशी ती कठोर
0 comments:
Post a Comment