तू गेल्यानंतर
Tuesday, February 2, 2010
तू गेल्यानंतर सगळ आयुष्यच विस्कटून गेलं
परतीच्या वाटेवर डोळ्यांमधून वाहून गेलं
तुझ्या वाटेवरून नजर काही केल्या हटेना
ओझरणारया तुला डोळ्यांत पूर्ण साठवत गेलं
केवळ क्षणांचा नाही तर आयुष्याचा विरह हा
अखेरचं हसू माझ्या चेहर्यावरून निघून गेलं
सहवासाचे क्षण असे नेहमीच जाळत राहणार
तुझ्या दुराव्यातून मला ते ही उमगत गेलं
सार्या प्रश्नांना उत्तर, सार्या संकटांचा अंत
माझ्याच कोड्याला सोडवायचं राहून गेलं
मार्ग आता वेगळा सख्या नको वळुस पुन्हा
काय करू मग???.. जर मन परत गुंतत गेलं....
परतीच्या वाटेवर डोळ्यांमधून वाहून गेलं
तुझ्या वाटेवरून नजर काही केल्या हटेना
ओझरणारया तुला डोळ्यांत पूर्ण साठवत गेलं
केवळ क्षणांचा नाही तर आयुष्याचा विरह हा
अखेरचं हसू माझ्या चेहर्यावरून निघून गेलं
सहवासाचे क्षण असे नेहमीच जाळत राहणार
तुझ्या दुराव्यातून मला ते ही उमगत गेलं
सार्या प्रश्नांना उत्तर, सार्या संकटांचा अंत
माझ्याच कोड्याला सोडवायचं राहून गेलं
मार्ग आता वेगळा सख्या नको वळुस पुन्हा
काय करू मग???.. जर मन परत गुंतत गेलं....
0 comments:
Post a Comment