मराठी चारोळ्या

Pages

"सचिन तेंडुलकर"

Thursday, February 25, 2010

"सचिन तेंडुलकर"
मज सांग तुजसाठीकाय मागू देवापाशी ?देव देतोजे जे काही सर्व आहे तुजपाशी |||| 
मोरपिस सुयशाचेआणतोस खेचुनी शोभते शिरपेचातठेवी मानाने खोचुनी ||||
नाणे फेक जिंको कोणीतुजसी नसे फरक |डोंगर धावांचे रचीकेव्हढा तुझा उरक ||||
उतरता तू मैदानीप्रतिस्पर्धी होई खिन्न |फटकेबाजी पाहुनीप्रेक्षक होती प्रसन्न | |||
आव्हान शत्रुचेहीलीलया झणी पेलतो |असतोस तू तिथुनीधाऊनी चेंडू झेलतो ||||
ठेवल्या जरी कितीहीतुझ्याकङुनी अपेक्षा देतोस भरभरुनीतू मोठ्ठा आभाळापेक्षा ||||
बाधते न तुज कधीहीकोणतीही यशबाधा |निर्लेप निर्विकारीउरतोस किती साधा ? |||| 
ऊर्ध्वगामी गति तुझीघेतो गगन भरारी यश कीर्तीची तोरणेउभारी जगतद्वारी ||||
हिरा तूची स्वशैलीचाकोंदणात जङविला स्वणॉक्षरी इतिहासतुझा तूची घडविला |||| 
लाभले भाग्य तुजलाइतरा नसे इतुके |सांगे उपेंद्र हर्षेआस्थेने कवतुके ||१०||
झळके क्रिकेट विश्वऐसे महान कर्तुत्व |दौडती विजयी अश्वगर्जती तुझे श्रेष्ठत्व ||११||
आशिष तुजप्रतीथोर माय-पित्यांचा |मिळे पुण्य वरदानतो स्पर्श देवकरांचा ||१२||

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP