एक उंच भरारी घ्यावी
Monday, December 14, 2009
एक उंच भरारी घ्यावी
नभ छेदून उंच ती जावी
स्वप्नाना कवेत घेउनी
यश कोंदुनी परतुनी यावी
.........एक उंच भरारी घ्यावी
.
.
पंखांची तमा नसावी
ना भय विशाल गगनाचे
अद्यात अनामिक आशा
श्वासात पुरून उरावी
.........एक उंच भरारी घ्यावी
.
.
कण कणात मी साठविली
हर एक हार ती माझी
क्षितिजाच्या गर्भात आता
ती विजयी पहाट रुजावी
.........एक उंच भरारी घ्यावी
0 comments:
Post a Comment