चारोळ्या1
Saturday, December 26, 2009
पावसावरच्या निबंधाला
कधीच पूर्ण मार्क मिळत नाहीत
कारण मार्क देणारा आणि घेणारा
दोघांनाही तो कळत नाही
श्रवण म्हणजे मला वाटतं
प्राजक्ताचे दिवस
स्रुष्टिने कधीतरी करून
फेडलेला नवस
शब्द हा शेवटचा उपाय आहे
प्रश्नांचं उत्तर मिळायला
नाहीतर एक कटाक्ष पुरतो
मनातलं गुज कळायला
मनाची तहान
पाण्यानं भागत नाही
हे बरं आहे की सगळ्यानाच
मनाची तहान लागत नाही
मला एक सुखी माणूस
त्याची दु:ख सांगत बसला
आणि माझा दाटून आलेला अश्रु
मी निमुटपणे पुसला
त्याच्याकडे काय मागायचं
हेच आपल्याला कळत नाही
म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही
पुढे अथांग पसरलेला सागर
मागे पसरलेला माझा गाव
मधे मी ठिपक्या एवढा
तरी मला माझं असं नाव
पहाटेआधी जाग येणं
किती त्रासदायक असतं
सोसून झालेलं आयुष्य
उघड्या डोळ्याना दिसतं
एक निरंतर प्रवास सुरु होतो
माझ्याकडून माझ्याकडे
आणि तुला वाटतं मी निघालो
पाठ फिरवून तुझ्याकडे
तू क्षितिजासारखा......
जवळ यायला लागलं की लांब राहतोस
आणि यायचं थांबलं की
आशेने पाहतोस
तू इथून दूर गेल्यानंतर,
अनेक वाटा माज्या आहेत,
पण पावला पावलावर
आठवणी मात्र तुज्याच आहेत.
0 comments:
Post a Comment