चारोळ्या
Saturday, December 26, 2009
देवळात जाणाऱ्या प्रत्येकाची
झोळी फाटलेली असते
देवाने त्यात कितीही सुखं टाकली
तरी मनीषा हि अपुरीच असते.
वादळात सापडलेल्या जहाजाला
किनाऱ्याचा विचार पडत नसतो
बुडतानाही कसे तरता येईल
याची शर्त करत असतो.
माझ्या मनाचा पिंजरा
मला नेहमी मोकळा वाटतो
कारण , मी त्या पिंजऱ्यात
मलाच अडकलेला पाहतो .
केव्हातरी मारायचं म्हणून
कोणी जगणं सोडून देत नाही
केव्हातरी रडायचं म्हणून कोणी
हसणं सोडून देत नाही.
दुरून पाहिल्यावर वाटतं
तार्यांमध्ये किती एकी असते
जवळून पाहिल्यावर कळत
कि ,ते किती एकटे असतात.
0 comments:
Post a Comment