काहीतरी चुकलेले!
Friday, December 11, 2009
काहीतरी चुकलेले!
वाटते काहीतरी ते चुकलेले!
तोंड तुझे असे का ग सुकलेले?
नेहमीचा रंग तो आज का नाही,
काय नजरेत माझ्या खुपलेले!
ताठा तो नेहमीचा आज कुठे ग,
फुल कुंतालावरी ते सुकलेले!
नजर कावरी बावरी अशी का?
खान्देही किंचितसे झुकलेले!
लगबग नाहीच कायमची ती,
रेशमी कापड कसे चुरगालले?
रागाऊ नकोस अशी सखये ग,
गाव तुझ्यामुले हे चुकचुकलेले!
प्रल्हाद दुधाल पुणे
0 comments:
Post a Comment