असलीच तर…!
Tuesday, December 8, 2009
असलीच माझी कविता तर
ती एक पळवाट आहे
विद्रुप वास्तवावर
स्वप्नील सौंदर्याच्या
कलमाची रुजवात आहे
असलीच माझी कविता तर
ती एक सुरुवात आहे
वास्तवाला कल्पनेनं दिलेली
शह आणि मात आहे!
असलीच माझी कविता तर
ती एक मळवाट आहे
नसेलही वीज नभांगणीची
निरांजनातली फुलवात आहे!


0 comments:
Post a Comment