हे अश्रू
Wednesday, December 2, 2009

समोरचे अश्रू पाहताना
ते पुसण्यापेक्षा
दूर होणं सोपं आहे
-----------------------------
अश्रूंची किंमत माझ्यासाठी
होती खूप काही
'जोपर्यंत मी स्वतः
कधी रडलो नाही'
येताना जे येऊन,
जाताना जाईल
पर्वा ना मनाची
मनाला राहिल
हा ना तो, तुम्ही स्वतः
देवही ना येईल
मग हे अश्रूही जगण्यासाठी
प्यावे लागतील
सारं जग पुसलं जाईल
आज आणि उद्या
त्या को-याशा जगावर
नव्याने लिहिलं जाईल
जो पुसतो हे जग सारंऽऽऽ
तोच पुसेल हे अश्रूही...
चांगलं पुसलं जात असेल जग
कदाचीत ओल्या अश्रूंनी
----------------------------------
0 comments:
Post a Comment