मराठी चारोळ्या

Pages

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

Wednesday, November 25, 2009


बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो
फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो
खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो
काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे
कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे
यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे
खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत  आहे.
माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे
हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे
काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही…….

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP