म्हणून
Friday, November 13, 2009
म्हणून
करतात सगळे म्हणून
प्रेम मीही करून पाहिलं
वाहत सगळे म्हणून
शपथांना मीही वाहिलं
गातात सगळे म्हणून
गाणे एक मीही गायलं
गाळतात आसवे म्हणून
मलाही रडू आले
विसरतात सगळे म्हणून
विसरवून मीही पहिले
कुणास ठाऊक का म्हणून
मला मात्र नाही ते जमलं
कदाचित खरे असेल म्हणून
माझचं प्रेम विजयी झालं
मोडली जगाची रीत म्हणून
सगळ्यांनी मला वेड्यात काढलं
सांगा यात काय माझं चुकलं........!
0 comments:
Post a Comment