मराठी चारोळ्या

Pages

तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा

Monday, November 2, 2009

तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा

तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा
तिच्या रंध्रांत मी अद्यापही आहे जरासा

जरी नाहीत भेटी , बोलणे नाही अता 
जगाच्या उंबऱ्याला लंघणे नाही अता 
कुणाला ना कळू देताच ती स्मरते मला 
मनाचा एक कप्पा राखलेला .. आपलासा 

कसा दाबून ठेवी हुंदका ती कोण जाणे 
कसे ते बंद झाले ओठही शिवल्याप्रमाणे 
कधी बेबंद झाले जर जुने आनंदगाणे 
जगाला ऐकु जाई फक्त तो हळवा उसासा 

किती पायांत बेड्या घातलेल्या आपल्यांनी 
असे जखडून नेले ती जणू की "बंदिनी
तरी पाहून गेली एकदा मागे वळूनी 
मला जगण्या पुरेसा एक तो आहे दिलासा

 

- मंगेश पाडगांवकर

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP