मराठी चारोळ्या

Pages

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

Monday, November 2, 2009

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..Tears, Watery Eyes, Itchy and Burning Eyes
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले....
सांगितले बरेच काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परीलावायचा तो लावून गेले...
लपविलेले जे दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले..
पुसले डोळे.. 
हसून खोटेचाचपले कितिक मुखवटेमुखवट्याला 
चेहर्‍यावरतीचढवायाचे आज राहून गेले.
लपविलेले जे दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले..
हसून आता.. विसरून सारेवावरते जणू.. 
उनाड वारेहसताना पुन्हा भरले 
डोळेपापणीतून अश्रु वाहून गेले.
लपविलेले जे दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले....
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले..

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP