मराठी चारोळ्या

Pages

पहिला पाऊस......

Monday, November 2, 2009


 
तो पहिला पाऊस आजही साक्ष देतो तुझ्या नि माझ्या प्रेमाची……
भिजलेल्या लाजर्‍या वेलीसारखे लवलवते हळूवार माझे मन
नि मला सावरणारा तुझा हात ,
सहवासातून फुललेले आपले प्रेम,
कळीचे फ़ूल होताना होणार्या हळूवार भावनेसारखे……
तो पहिला पाऊस आजही साक्ष देतो………….
एक आहेत तुझी नि माझी स्पंदने,
व्यतीत होणारा प्रत्येक क्षण फ़क्त दूर जाणार आपण याची आठवण देत आहे,
पण विरहसुद्धा पायरी आहे प्रेमाची…..
त्यागाची पवित्र भावना जाणवून देते हे प्रेम,
तो पहिला पाऊस आजही साक्ष देतो………….
माझे अस्तित्व कधीच मिसळून गेले तुझ्या अस्तित्वात,
नि मी हरवून गेले माझ्यापासून,
दूर गेलो कितीही तरीहि प्रेम तुझे माझे कमी होणार नाही,
प्रत्येक विरहाच्या क्षणाबरोबर वाढत जाईल ते,
तुझ्या सहवासातील त्या आठवणींवर मी जगेन,
जरी दूर तुझ्यापासून राहीन,
तो पहिला पाऊस आजही साक्ष देतो……………..
दूर जरि तू नि मी जवळ असेल तुझे प्रेम,
तुझे अस्तित्व नि माझे मन,
आपण एकत्र पाहिलेली स्वप्ने नि त्या स्वप्नात भरलेले रंग,
तो पहिला पाऊस आजही साक्ष देतो…………….

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP