कधी कधी असे वाटते
Wednesday, November 18, 2009
कधी कधी असे वाटते
नुसतंच तुझ्या कडे पाहत राहावं
आणि तुला पाहताना
स्वतःला विसरून जावं.
कधी कधी असे वाटते
नयनाची भाषा बोलत राहावे
आणि नयनाची भाषा बोलताना
ओठ आहेत हेच विसरून जावं.
कधी कधी असे वाटते
तुझ्या सोनेरी केसात
गुलाबाचे फुल माळावे
आणि फुल माळताना
काटे टोचतील हेच विसरून जावे.
कधी कधी असे वाटते
माझी सुखे तुला द्यावी
आणि सुख देताना
दु:ख आहे हेच विसरून जावे.
0 comments:
Post a Comment