मराठी चारोळ्या

Pages

काळजी घे

Monday, November 30, 2009


एकदा एका गावात
एक आधंळा होता मुलगा
प्रेयसीच्या प्रेमामध्ये तो
रमला होता चांगलाच

मित्रांमध्ये तो कमी रमायचा
सर्वांचा तो राग करायचा
धिडकारुन सर्व जगाला मग
फ़क्त प्रेयसीलाच जवळ करायचा

तो नेहमी म्हनायचा तिला
जर दिसत असते डोळ्याने मला
तर लग्नाचा हा हार
घातला असता फ़क्त तुलाच

ती बिचारी लाजेनं चुर व्हायची
डोके ठेवुन त्याच्या छातीवर
देवाजवळ प्रार्थना करायची
आणी काळजी मग डोळ्याची करायची

मग एके दिवशी चमत्कार झाला
न बघनारा तो आता बघु लागला
कुनीतरी डोळे दान केल्या मुळे
स्वत:च्या डोळ्यातच स्वत:ला हरवु लागला.

पन जेव्हा त्याने तिला बघितले
त्याच्या मनातले विचार बदलले
कारण तिला सुद्धा द्रुष्टी नव्हती
त्याच्या सारखी ती सुद्धा लाचार होती

पन त्याला दिसु लागल्याची खुशी तिला होती
देवाचे ती उपकार मानत होती
त्याच्या सुख संसाराच्या स्वप्नात
कित्येकदा स्वत:लाच ती हरवत होती.

मग तिने त्याला विचारले
आता तु माझ्याशी लग्न करशील ?
तुझ्या हाताने माझ्या गळ्यात
लग्नाची ती माळ घालशील ?

पन आता त्याने लग्नाला नकार दिला
ह्रुदयाशी तिच्या मोठा घात केला
एवढे दिवस असलेल्या प्रेमाला
क्षनात त्याने पुर्णविराम दिला.

आता तिचे तर भानच हरवले
दुर जान्याचे तिने ठरवले
जाता जाता त्याला एवढेच म्हनाली
काळजी घे माझ्या ह्या दोन डोळ्यांची .....

Read more...

तुला भेटल्यापासुन .......


तुला भेटल्यापासुन आम्ही असे काही बदलत गेलो
तुझ्यावर कविता करुन त्या स्वत:च गुनगुनत गेलो

जेव्हा तुझ्या आवडींना आम्ही जवळ करत गेलो
तेव्हा हळुहळु आमच्यात सुद्धा बदल करत गेलो
तुझ्या प्रेमाखातर आम्ही बदलुन आम्हाला
तुझ्या आठवनीत रोज रोज स्वत:ला हरवत गेलो
तुला भेटल्यापासुन आम्ही असे काही बदलत गेलो
तुझ्यावर कविता करुन त्या स्वत:च गुनगुनत गेलो

लोकांना भेटन्याचा आम्हाला कधी छंद होता
मैफ़लीमध्ये रमन्याचा तेव्हा खेळ मंद होता
तुझ्यासाठी आम्ही हे सुद्धा करत गेलो
लोकांशी भेटु लागलो, मित्रांमध्ये रमत गेलो
तुला भेटल्यापासुन आम्ही असे काही बदलत गेलो
तुझ्यावर कविता करुन त्या स्वत:च गुनगुनत गेलो

तुझ्याबद्दल आम्हाला जेव्हा विचारु लागला कुनी
काय सांगु तेव्हा काय मोठी गडबड झाली
सांगन्यासारखी गोष्ट आम्ही विसरत गेलो
गोष्ट जी लपवायची होती तीच आम्ही सांगत गेलो
तुला भेटल्यापासुन आम्ही असे काही बदलत गेलो
तुझ्यावर कविता करुन त्या स्वत:च गुनगुनत गेलो

इश्क बेघर करते, इश्क बेदर करते
इश्काचा खरच काही ठिकाना नाही
कालपर्यंत आम्ही होतो ठिकान्यावर
आज आम्ही आमचा ठिकानाच विसरत गेलो
तुला भेटल्यापासुन आम्ही असे काही बदलत गेलो
तुझ्यावर कविता करुन त्या स्वत:च गुनगुनत गेलो

Read more...

आयुष्याच्या अल्बममध्ये

Friday, November 27, 2009

See full size image
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा

Read more...

तो तिला म्हणाला

"बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू"

"नको आज काकू यायच्यातसगळेजण घरीच जेवू"

 

"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"

"बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट"

 

आता मात्र तो हिरमुसलाकेली थोडी धुसफूस

एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

 

सिगरेट पेटवतएकटाच तो निघून गेला चिडून

डोळे भरून बघत राहिलीती त्याला खिड़की आडून

 

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना

सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

 

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली

अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

 

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला

"रागावलास  माझ्यावर?" आणि तो विरघळला।

 

"थोडासा..." त्याने सुद्धा कबूल केला आपला राग

ती म्हणाली "बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग"

"माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल

छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल

अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस

सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस...

तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं

झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?"

 

"बोललास हेच पुरे झाल...एकच फ़क्त विसरलास...

माप ओलांडून आले होतेमी-तू पण तेव्हाच गळलं

माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?"

Read more...

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP