मराठी चारोळ्या

Pages

|| आली आली दीपावली ||

Wednesday, October 14, 2009

|| आली आली दीपावली ||

आली आली दीपावली, मौज वाटे भारी |
उजळुनी निघतील, दिशा चारी चारी || १ ||

काना-कोपरे घराचे, छानसे सजवू |
पाना-फुलांची तोरणे, दारावरी लावू || २ ||

सारे मिळुनिया करू, किल्ला शिवनेरी |
रंगी-बेरंगी चित्रही, मांडू किल्ल्यावरी || ३ ||

झिरमळ्यांचा बनवू, आकाश कंदील |
उंच उंच झाडावरी, दादा तो बांधील || ४ ||

मित्र-मैत्रिणींना धाडू, सुभेच्छांची पत्रं |
पाहुनी ती होईल हो, आनंद सर्वत्र || ५ ||

पणत्यांची ज्योत देई, मंगल संदेश |
सुख-समृद्धिचा होवो, जीवनी प्रवेश || ६ ||

आई-ताई काढतील, अंगणी रांगोळी |
तेल, उटणे लावुनी, करू या आंघोळी || ७ ||

नव्या-नव्या कपड्यांचा, होई थाटमाट |
गोड-धोड़ फ़राळाचे, येई पुढे ताट || ८ ||

नको नको आवाजाच्या, फटाक्यांच्या लड़ी |
कानामध्ये बसेल हो, कायमची दडी || ९ ||

देवापुढे, आई मांडे, मोठ्ठ अन्नकोट |
पण तेवढ्यानं कसे, भरे त्याचे पोट ? || १० ||

म्हणुनीच प्रश्न पड़े, माझ्या मना जरा |
अनाथ, हा सण कसा, करिती साजरा || ११ ||

अनाथांची कशी बरे, असते दिवाळी ? |
लखलख प्रकाश कां, आहे त्यांच्या भाळी ?|| १२ ||

सामावुनी घेऊ त्यांना, सा-या आनंदात |
प्रकाशाच्या वाटा येवो, त्यांच्या जीवनात || १३ ||

दीप खुशीचे दिसता, त्यांच्या मुखावरी |
देवालाही आवडेल, तेच खरोखरी || १४ ||

(ही रचना पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली आहे.)

------------ --------- --------- --------- --------- --------

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP