मला गुंतण्याचे ते भोग कळाले
Wednesday, October 28, 2009
मला गुंतण्याचे ते भोग कळाले
मला गुंतण्याचे ते भोग कळाले,
आता एकटीने जगायचे म्हणाले
उराशीच होते मी गंध बाळगून,
आता विरहाने दर्वळायाच म्हणाले
आता एकटीने जगायचे म्हणाले
आठवून येते तुझीच रम्य भेट,
ती मातीत क्षणांच्या पुरायच म्हणाले
आता एकटीने जगायचे म्हणाले
कधी हासलेले तुझ्या हासण्याने,
आता आसवांनी मूस मुसायच म्हणाले
आता एकटीने जगायचे म्हणाले
मी राहीले पाहात तो गेला फिरून,
तू सरलेला श्रावण का ? वळायच म्हणाले
मला गुंतण्याचे ते भोग कळाले,
आता एकटीने जगायचे म्हणाले ……
0 comments:
Post a Comment