गझल
Monday, October 26, 2009
गझल
जळणे सोडले तसे,
जाळणे सोडले मी.
माझेच काही नियम,
पाळणे सोडले मी.
हसणेच माझे आता,
दिसेल रोज तुम्हा.
चारचौघात अश्रू ते,
गाळणे सोडले मी.
कळले जेव्हा काटे,
संभालती फुलांना.
तेव्हा कुठलेही काटे,
साहणे सोडले मी.
संकटेच शिकवती,
संकटात जगणे.
म्हणूनच संकटांना,
टाळणे सोडले मी.
माणसे सारी इथली,
वाचायची 'प्रशांत'
म्हणून वही आता,
चाळणे सोडले मी!
0 comments:
Post a Comment