का, 'कुणास ठाउक..........,
Tuesday, October 13, 2009
का, 'कुणास ठाउक..........,
जुन्या गोष्टी आठवल्या की, आजही मी होतो भाऊक....,
का, 'कुणास ठाऊक......?,
आई, 'सगलं आठवतं मला....पप्पांची गेलेली नोकरी....,
गैस-सिलेंडर बाजूला सारून... तू तयार केलेली चुल.. आणि त्यावरची ती भाकरी....,
तेव्हा न आवडनारी 'भाकरी' आवडीने खाताना.., आजही मी होतो भाऊक....,
का 'कुणास ठाऊक...?,
आई,
सगलं आठवतं मला,
तुझ्या अंगावरचे सोने, वकिलाच्या फी साठी पप्पांनी मोडून काढलेले,
दुसर्यांची आई जेव्हा सोन्याची पोत काढायची, तू मला आपटयाच्या पानांनी ओवाळायचि,...,
त्या पानांना सोन्या सारखाच मान असतो ना, अशी सांगायची......,
जपून ठेवलेली ती सोन्याची पानं जुन्या पुस्तकात दिसली.. की आजही ...मी होतो भाऊक....,
का, 'कुणास ठाऊक..?,
आई,
दिवाळीला मी म्हणायचो,
आई, तो प्रणव बघ ना, कित्ती सारे फटाके फोड़तोय, लहान मोठे, रंगीबेरंगी....,
'बाळा,चांगले नाही ते, फार कर्कश्य आवाज आहे त्याचा, आणि प्रदुषण किती......,
दगडावर बत्त्यानी, टिकल्या फोड़ताना लहान मुले दिसली की.., आजही मी होतो भाऊक
का, 'कुणास ठाऊक...?,
आई,
आठवतं.. मला.....,
लहानपणी माझा हवरटपना, किती गोडं खायचो,
कुणी काही दिलं की लगेच घ्यायचो.., आणखी मागायचो,
तू रागवायची, 'भीक्कारडा' म्हणायची, मला पदरात घेउन.. स्वताहाच रडायची..
आता सोडलाय मी हवरटपना, मोठ्ठा झालोय ना......
पण तू केलेला गोड पदार्थ खाताना... आजही.. मी होतो भाउक.....
का, 'कुणास ठाउक.,
का, 'कुणास ठाउक..........,
0 comments:
Post a Comment