नको विचारू प्रेम तुझे
Wednesday, October 21, 2009
नको विचारू प्रेम तुझे
किती मला छळतय
तुझे नुसते नाव ही एकले
तरी मन आज ही जळतय
बेवफा आहेस तु
गद्दारी करुण गेलीस
हेच मन पुन्हा पुन्हा बडबडतय
नको विचारू प्रेम तुझे
किती मला छळतय
एक एक गोष्ट आठवून तुझी
मन आज ही अश्रु ढाळतय
सर्वस्व मानल होत न तुला
म्हणुनच ह्या अस घडतय
तु मध्येच हात सोडून
अर्ध्या वाटेतुन निघून गेलीस
का आणि कश्यासाठी
ह्या अस वागलीस
उत्तरासाठी ह्याच मन
खुप खुप तरफडतय
नको विचारू प्रेम तुझे
किती मला छळतय....
0 comments:
Post a Comment