!!रोज वाटत,
Thursday, October 22, 2009
!!रोज वाटत,
कोणीतरी आपली काळजी करणार असाव.
मायेने पाठीवरून हात फिरवणार असाव.
अपयशात नवी चेतना देणार नि,
यशात अभिमान बाळगाणार असाव.
रोज वाटत,
कोणीतरी दू:ख वाटून घेणार असाव.
सुख द्विगुणित करणार असाव.
अड़थल्यांमधून मार्ग दाखवणार नि,
त्या मार्गावर सोबत चालणार असाव.
रोज वाटत,
कोणीतरी आपल्यावर हक्क दाखवणार असाव.
हक्काने दरडवणार असाव.
आपल्या चुका पाठीशी घालणार नि,
वेळेप्रसंगी खडसावणार असाव.
रोज वाटत,
कोणीतरी प्रेमाने आपलाही हात हातात घ्यावा.
माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे अस म्हणाव.
कोणीतरी फ़क्त आपलाच असाव नि,
आपण फ़क्त त्याचच असाव.
कोणीतरी नक्की असेल आपल्यासाठी ही,
त्या दूरच्या गावात,
आपली ही वाट बघत.
0 comments:
Post a Comment