मराठी चारोळ्या

Pages

प्रेमाचा गुलकन्द- प्र. के. अत्रे.

Tuesday, October 27, 2009

प्रेमाचा गुलकन्द- प्र. के. अत्रे.

बागेतुनी व बाजारातुनी
कुठुनी तरी 'त्याने'
गुलाबपुष्पे आणून द्यावीत
'तिज'ला नियमाने

कशास सान्गू प्रेम तयाचे
तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिन्ग यातले
काय असावे ते!

गुलाब कसले प्रेम पत्रीका
लाल गुलबी त्या
लाल अक्षरे जणू लिहलेल्या
पाठोपाठ नुसत्या

प्रेमदेवता प्रसन्न हो! या
नैवद्याने
प्रेमाचे हे मार्ग गुलबी
जाणती नवतरणे

कधी न त्याचा ती अवमानी
फ़ुलता नजरणा
परी न सोडला तिने आपुला
कधीही मुग्धपणा

या मौनातच त्यास वाटले अर्थ
असावे खोल
तोही कशाला प्रगट करी मग
मनातले बोल

अखेर थकला ढळली त्याची
प्रेमतपश्चर्या
रन्ग दिसे ना खुलावयाचा
तिची शान्त चर्या

धडा मनाचा करुन शेवटी म्हणे
तिला 'देवी'
दुजी आणखी विशेषणे तो
गोन्डस तिज तो लावी

"बान्धीत आलो पुजा तुज मी
आजवरी रोज
तरी न उमगशी अजुन कसे तू
भक्ताचे काज

गेन्द गुलाबी मुसमुसणारे
तुला अर्पिलेले
सान्ग सुन्दरी फ़ुकट का सगळे
गेले?"

तोच ओरडून त्यास म्हणे ती
"आळ ब्रु था हा की
एक पाकळी ही न दवडली तुम्ही
दिल्यापैकी"

हे बोलूनी त्याच पावली आत
जाय रमणी
क्षणात घेउन ये बाहेरी
कसलीशी बरणी

म्हणे "पहा मी यात टाकले
तुमचे ते गेन्द
आणि बनवला तुमच्या साठी
इतुका गुलकन्द

का डोळे असे फ़िरवता का आली
भोन्ड
बोट यातले जरा चाखुनी गोड
करा तोन्ड"

क्षणैक दिसले तारान्गण
त्या परी शान्त झाला
तसाच बरणी आणि घेवुनी
खान्द्यावरी आला

"प्रेमापायी भरला" बोले
"भुर्दन्ड न थोडा
प्रेमलाभ नच, गुलकन्द तरी
कशास हा दवडा?"

याच औषधावरी पुढे तो कसातरी
जगला
'दय थाम्बुनी कधीच ना तरी
असता तो' खपला!

तोन्ड आम्बले असेल
ज्यान्चे प्रेम निराशेने
प्रेमाचा गुलकन्द तयानी
चाखूनी हा बघणे


- प्र. के. अत्रे.

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

Error loading feed.

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP