***... वळ मित्रा ...***
Thursday, January 21, 2010
***... वळ मित्रा ...***
जिव्हाळा की आत्मियतानाते असो की नातलग
कुणी कामास येत नाही,
असोत जरी ते जीवलग....
कितीक श्रीमंत झाले,
कितीतरी कंगाल झाले
मात्र राखेत मिळताच ,
सारे सारखेच झाले...
पाहू शकत नव्हतो तेव्हा,
तलाव वाटायचा थेंबासारखा
आता डोळे उघडले तर,
थेंबही भासला तलावासारखा.....
मृत्यू नजरेसमोर येताच,
मति माझी गुंग झाली...
जगावरून मन उठताच,
संपत्ती नजरेतून लुप्त झाली....
जग जर का लाभले तर,
आपल्याला जडतो रोग...
जग नाहीच मिळाले तर,
मन आतूर,केव्हा मिळे भोग....
कधी वाटतं ,मुक्त व्हावं
पळावं मायाजाळ तोडून...
लोचट लोभी मन माझं,
ठेवतं बोट घट्ट धरून....
ईश्वराला शोधता शोधता,
माझेच मन हरवले...
प्रवाशाने चालता चालता ,
स्वतःसच लक्ष्य बनवले....
आराम हवा असेल तर,
'राम' म्हण तू मित्रा...
अडकायचेच असेल तर,
जाळ्याकडे वळ मित्रा ...
0 comments:
Post a Comment