मराठी चारोळ्या

Pages

Showing posts with label प्रेम/विरह कविता. Show all posts
Showing posts with label प्रेम/विरह कविता. Show all posts

ती येणार होती, नाही आली......!

Thursday, November 25, 2010

ती येणार होती, नाही  आली......!
पण.............!
तिची  आठवण 
मात्र येऊन गेली...!
शेवटी  तिला भेटण्याची इच्छा मनीच राहून गेली...!तरी पण ......!
भास झाला मनाला ..!
वाटल कि, ती आली...!
पण.............!
दार उघडून पाहतो तर काय....
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली.............!
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली.............!

Read more...

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

Wednesday, August 4, 2010

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

Read more...

तिची आठवण अन ती...

तिची आठवण अन ती...
 
बागेतल्या रोजच्याच ठिकाणी
रोजच्याच वेळी...
मी तिची वाट बघत होतो
रोजच्याच प्रमाणे तिला
आज ही उशीर झाला होता
आणि रोजच्याच प्रमाणे मी ही
पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत होतो ...

ती येण्याआधी मग, रोजच्याच प्रमाणे
आधी तिची आठवण आली ...
मी ही मग सवयी प्रमाणे ...
गेलो आठवणीच्या संगे..
पुन्हा एकदा..
केली सैर आजवरच्या प्रवासाची.....

आलो जेव्हा भानावारती..
जवळ माझ्या ती बसली होती
डोळे मोठे...नाक फेंदारालेल..
माझ्या मनी डोकावली भीती...

चेहऱ्यावर ढळलेली बट...
डाव्या करंगळीने माघे सारून..
जळजळीत नजर माझ्यावर फेकून...
बोलली ती मला....

"आज काय असेल तो
सोक्ष मोक्ष लावून टाक...
कोण तुला जास्त प्यारी
माझी आठवण की मी स्वतः
या प्रश्नाचे उत्तर तू
लगेच मला देऊन टाक... "

मग स्वतःच रुसली..
मान वळवूनं बसली...
पडलो होतो मी संभ्रमात....
इतक्यात...
तिचीच आठवण...खुदकन हसली...

मग बोललो मी तिला
टाकू नकोस अशी तू
धर्मसंकटात मला....
तुझी अन माझी भेट
फ़क्त काही तासांची असते
तुझी आठवणच मग सखे
नेहमी माझ्या सोबत असते
तुझ्या विरहाला तुझी आठवणच
माझ्या पासून दूर ठेवते...
तू नसताना तुझ्याच रूपाने
अगदी नववधु प्रमाणे सजते...
रात्रभर मग तिच्याच कुशीत मी
तुझीच स्वप्ने वेचीत जातो...
बांधून त्यांच्या तोरणमाळा
मी तव आगमनास झुरतं राहतो...

न कळले तुला जे आजवर
ते सांगतो मी आता..

तुझ्याविना नाही सखे
तुझ्या आठवणींचे अस्तित्व ....
अन तुझ्या आठवणींशिवाय प्रिये
कोण सांगेल तुझे महत्त्व ......

MAIL BY
--
(`*•.¸ (`*•.¸ ¸.•*´) ¸.•* )
..::¨`•*  संजना  *¸.•`¨::..
.(¸.•*(¸.•*´ `*•.¸)*•.¸).

Read more...

आवडत्या माणसाचा फोन

Monday, August 2, 2010

Read more...

माझिया प्रियाला प्रीत कळेना

Thursday, July 29, 2010

Read more...

भेटूया का?..

भेटूया का?..
ओथंबलेल्या घनात ..
त्या रिमझिमत्या पावसात ..
नको उघडूस ती छत्री,
जरा भिजुदेत ना सरी
भेटूया का?..
झोंबत्या गार वाऱ्यात ..
त्या कोसळत्या धबधब्यात ..
घेवुन हात तुझा हातात,
जरा सावरुदेत ना खडकात
भेटूया का?..
उधळत्या सागर लहरीत ..
त्या बांधावर छत्रीत ..
सामावत तुझ्या मिठीत,
जरा लाजुदेत ना खळीत
भेटूया का?..
गोड गोड स्वप्नात ..
त्या फुललेल्या बनात ..
हरवेन मी हरपेन मी,
पुन्हा शिरता त्या क्षणात

भेटूया का?..

MAIL BY 
★彡●๋ दिप★彡●

Read more...

तुला विसरणं ...

Monday, June 21, 2010

तुला विसरणं हा

तुला आठवनयाचाच एक बहाणा आहे,
नकोसा आणि केविलवाणा !!!

तुला विसऱ्ण्या इतक
मी तुला आठवलाच नव्हत
फक्त साठवलं होत प्रत्येक श्वासात !!!

तुझी प्रत्येक गोष्ट
मी अगदी डोक्यातून काढून टाकलीय
फक्त मनात रुतून बसलीय
एक्यादया निर्गाठीसारखी !!!
तुझ्याविनाही आयुष्य सुरूच आहे
फक्त माझ 'मी' पण परत दे
जे तुझ्यासोबत आहे.... निरंतरपणे !!!

Read more...

तर मग तुम्ही प्रेमात पडला आहात

Wednesday, June 16, 2010

तर मग तुम्ही प्रेमात पडला आहात

जेव्हा तुम्ही कोणा खास व्यक्ती बरोबर असता.
तुम्ही त्याचाकडे दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता,
पण जेव्हा ती खास व्यक्ती तुमच्या जवळपास नसते.
तेव्हा तुमची नजर त्यालाच शोधत असते.
हो ना .... तर मग तुम्ही प्रेमात पडला आहात .
तुम्हाला हसवणारा कोणीतरी तिथे आहे,
तरी तुमचे लक्ष कोणत्या तरी खास व्यक्तिकडे आसते
तर तुम्ही नक्कीच प्रेमात पडला आहात .

खर तर त्याने खुप आधीच तुम्हाला येण्याचे वर्दी दयाला हवी होती,
पण तुमचा फोन वाजताच नाही,
पण तुम्ही मात्र त्याच्या फोनची आतुरतेने वाट पाहत असता,
तर मग शंकाच नाही तुम्ही नक्कीच प्रेमात पडला आहात .


मेलबोक्स/इनबोक्स मध्ये त्याचे/ तिचे भरपूर मेसेज आहेत
सारखे सारखे भाघावायाचे वाटतात,
क्यापेसिटी संपली तरी ते मेसेज डिलीट करावयाचे वाटत नहीं,
तेव्हा तुम्ही त्यांचा प्रेमात पडला आहात .

"तो/ती फक्त माझा/माझी चांगला/चांगली मित्र/मैत्रिण आहे",
तुम्ही अस सगळ्याना नेहमी सांगत असता,
तरी त्याचे/तिचे विचार टालता येत नाही,
म्हणजे तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला आहात .
हे वाचतानाही मनात कोणीतरी डोकावत नाही ना?
तर. . . तर. . . तर. . .
लाजुन हसू नका, तुम्ही खरोखरच त्यांच्या प्रेमात पडला आहात .

--
Regards,
Sandip

Read more...

सुकलेली फुलं

सुकलेली फुलं
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.. 
मी बोलतच नाही 
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात.. 
तिला कळतच नाही 


तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो.. 
स्तब्ध होऊन 
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते.. 
क्षुब्ध होऊन 

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येत 
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत 

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो 
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो 

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही 
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही 

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं 
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं 

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही 
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही 

ती नाही म्हणेल याची भीती वाटते 
ती नाही म्हणेल याची भीती वाटते 
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं 
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं 

कुणास ठाऊक? 
तिच्याही एखाद्या पुस्तकात 
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील... 

-- 
Regards,
Sandip

Read more...

पहायचे होते मला..

पहायचे होते मला..
तुझ्या डोळ्यांत , माझे प्रतिबिंब..
पहायचे राहून गेले..

ऐकायचे होते मला..
तुझ्या आवाजात , माझे नाव..
ऐकायचे राहून गेले..

अनुभवायचे होते मला..
तुझ्या श्वासांत , माझे श्वास..
अनुभवायचे राहून गेले..

तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे....राहून गेले....

भेटीचे तर होते............ ....फक्त बहाणे ,
मजसाठी तर झाले असते ते , ’ जगणे ’..

तुझ्या डोळ्यांच्या तेजात ,
उजळले असते लक्ष दीप , माझ्या नेत्रांत
जे तेवत राहिले असते , उदास अंधा-या रस्त्यांत..

तुझ्या श्वासांच्या सुगंधात ,
फुलले असते संजीवन प्राण , माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन , श्वास रोखणा-या क्षणांत..

तुझ्या आवाजाच्या मारव्यात ,
गुंजले असते मधुर गीत , माझ्या आत्म्यात
जे देत राहिले असते साद , भग्न एकाकी आयुष्यात..

पण, पण....

एक ’ भेट ’ काय टळली..
अन ' जगायचे ' राहून गेले..

' तुझ्याबरोबर ' जगायचे राहून गेले..



-- 
     Raj Tambe

Read more...

ठेव विश्वास माज्यावर

Wednesday, May 26, 2010

ठेव विश्वास माज्यावर
असे कधी म्हाणु नकोस
मित्र आहें मी तुजा
हे कधी विसरु नकोस ||१||

नाते आपले हे प्रेमाचे
अखंड चालू राहू दे
समजून घेतलेस तू मला
मैत्री अशीच वाहू दे||२||

ना मंजूर जर असेल लोकाला
मैत्री आपली सत्याची
जीवन मरण देवाच्या हातात
शरीर मातीच्या मित्याची ||३||

मित्र म्हणजे भावुच आहें
जीवलग, सखा कोणीही समज
दोस्ती आपली पक्की ठेव
तू आता हे लवकर उमज||४||

Mail By DIP

Read more...

प्रेम असं असावं ..................

Saturday, May 15, 2010

प्रेम असं असावं ..................

प्रेम कसं असावं
हे नाभाकडून शिकावं
बरसवून मोत्यांच्या धारा
त्याने धरणीला भिजवावं
नटवून हिरव्या शालुने
त्याने तिला सजवावं
उतरून क्षितिजावर कधीतरी
एक गोड चुंबन घ्यावं
प्रेम असं असावं .................

प्रेम कसं करावं
हे नदीकडून शिकावं
आस मिलनाची घेऊन उरी
त्याच्यासाठी दरीखोऱ्यातून धावावं
कितीही वळणं आली तरी
अखेर हृदयी सागराच्याच समवाव
प्रेम असं असावं ..................
प्रेम असं असावं ..................

अभिजित देवगिरीकर

Read more...

तू खुश तर आहेस ना!!

Thursday, May 13, 2010

कधी आयुष्यात आलीस  अन कधी माझी सवय झालीस काही कळलेच नाही..
एक एक दिवस जात होता .. अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..
कदाचित तुला मी वेडा वाटत असेन.. अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..
तुझ्या एका प्रेमळ कटाक्षासाठी.. तुझ्या प्रेमळ मिठी साठी..
पण कदाचित ते शक्य नाहीये ... तुला ...
शेवटी मनाला घटत आवळून तुही बुद्धीनेच निर्णय घेतलास ना..!!
आपल ते प्रेम , आपल्या त्या आठवणी..
येवढ्या सहज तू विसरू शकशील..?
कदाचित हो असेल तुझ उत्तर...
 
पण मनातल्या त्या एकांत कोपरयात माझी जागा कायम असेल
हेही मी जाणतो..
होईल तुलाही कधी तरी पश्चाताप होईल कि ऐकल असतं जर तेव्हाच मनच तर..
 
पण वेळ गेल्यावर काय करणार..
त्यावेळी कोणाला सांगावस वाटल तरी तुला ते शक्य नाही होणार..!!
आयुष्याच्या एखाद्या वळणावर कदाचित आपली भेट होईलही ..
पण त्यावेळीही मला हेच जाणून घेण महत्वाच असेल कि
कि
कि
 
तू खुश तर आहेस ना!!  
MAIL BY निलेश कि. कोंडविलकर

Read more...

मी चातक पक्षी तीज प्रेमाचा

Saturday, May 8, 2010

मी चातक पक्षी तीज प्रेमाचा
मी चातक पक्षी तीज प्रेमाचा

परी उतरलो मी तळ्याकाठी
प्यायले नाही पाणी त्यातले

मी तीचाच चातक पक्षी
मी तीचाच चातक पक्षी

मी तीच्या प्रेमाचा भूकेला
न राहवे तीज वीण मला

आकांताने ओरडतो मात्र
प्येत नाही पाणी कोणाचे

रे मी...
मी चातक पक्षी तीज प्रेमाचा
मी चातक पक्षी तीज प्रेमाचा...

केतन घरत(ठाणे)

Read more...

काय माहीत तीच्या मनामधे काय आहे..

जशी ती हसायची..
जशी ती वागायची..
बोलयची..
हवी-हवीशी वाटणारी ती..

मला तीची जवळीक पहिजे होती
काय माहीत तीच्या मनात काय होते

प्रेम करायचो मी तीला भरपूर
काय माहीत तीला समजले की नाही

शंभर वेळा मनामधून बोललो असेल
काय माहीत तीने माझ्या डोळ्यांत वाचले आहे की नाही

मी पण विचारात..
नक्की हेच प्रेम आहे ?

जर हेच प्रेम आहे
तर..

मला अजुन तीच्या उत्तराची अपेक्षा आहे..
काय माहीत तीच्या मनामधे काय आहे..

केतन घरत(ठाणे)

Read more...

किती छान असतं ना ? आपण कुणालातरी आवडणं...

किती छान असतं ना ? आपण कुणालातरी आवडणं...
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी तासनतास आपलाच विचार
करणं....
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणाच्यातरी पर्सनल डायरित
आपलं नाव असणं ,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच
उल्लेख करणं,
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू
मोत्यासमान वाटणं...
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं....

कुणीतरी आपल्या फोनची
तासनतास वाट पाहणं ,
आपल्याला एकदा ओझार्त
पाहण्यासाठी ,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं ,
देवसमोरही स्वताआधी
आपलं सुख मागणं ,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,
आपल्या उपवासा दिवशी
त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं..
झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं....
खरच, खूप छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं.......

Read more...

आज तुझी आठवण येत आहे..

Thursday, April 29, 2010

आज तुझी आठवण येत आहे..
आहे मी जिथे उभा
हाथात होता हात तुझा..
आज त्या रस्त्यावर एकटा उभा आहे
आज तुझी आठवण येत आहे..

दाटून आलेले ढग तो रिमझिम पाउस
एका छत्रीत ते जवळीक साधण..
आज एका आडोश्याला मी उभा आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

पहाटेची पहिली किरण
तुझं अलगद येऊन केसांचे पाणी उडवण ..
आज पहाट रात्रीपेक्षा भयाण आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

मधुर चांदण्याची ती रात्र
ऑफिस मधून घरी यायची घाई..
आज दाराचे कुलूप उघडायला घाबरत आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

तुझ्या प्रेमाने सजलेले ते घर
प्रत्येक कोपर्यात तुझाच भास..
आज तुझ्या एका हाकेस आतुर झालो आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

असह्य यातनाच ओझ दिलस
डोळ्यातील अश्रू हृदयातूनी वाहतात..
अखेरचा श्वास तुझ्या कुशीत सोडायचा आहे
आज तुझी आठवण येत आहे..

जीवन मुक्तीच साकड देवाकडे घालतोय
हसत हसत मरण याव याची वाट बघतोय
जवळ तुझ्या आज मी येत आहे..
आज तुझी आठवण येत आहे..आठवण येत आहे...

Read more...

काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!

Saturday, April 24, 2010

नटून थटून आली जेव्हा ती बेस्ट बसमधून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

पाहताच तिला मी एकदम क्लीन बोल्ड झालो…
एप्रिल च्या कडकडीत दुपारी आय ऍम सो कोल्ड झालो!
भूक हरवली, झोप उडाली झालो दिवाना तिज पाहून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

व्हॅलेंटाइन्सला ठरवलं, तिला सांगू मनातली गोष्ट…
पण दुर्भाग्य माझं असं की तिचे भाऊ होते फार धष्टपुष्ट!
गोष्ट राहिली बाजूलाच, आणि आलो मी हनुमान होऊन…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

मी ही हार मानणारा नव्हतो म्हटलं शोधू नवा मार्ग…
तडक जाऊन मग शोधून काढला मी एफवायबीकॉम चा वर्ग!
जे काही पाहिले ते पाहतंच राहिलो डोळे विस्फारून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

विश्वास बसता बसेना की ती वर्गासमोर उभी होती…
एफवाय च्या वर्गाला ती ‘सी प्रोग्रॅमिंग’ शिकवत होती!
जिच्यावर लाईन मारत होतो आलो तिलाच मॅडम म्हणून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!

कि .

Read more...

तु असती तर...

Thursday, April 22, 2010

तु असती तर....
फार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप
भांडता भांडता अचानक
काहितरी भयान शांतता झाली असती
एखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर
परत यावा...! अशी माझी नजर
तुझ्या नजरेला स्पर्शुन परत आली असती
अन् मग हळुच.... तुझ्या तळहातांवर
माझ्या ओठांनी चुंबन फुले ठेवली असती....
अन् मग नकळत.... आपलं भांडण मिटलं असतं....

तु असती तर....
आयुष्यात फार तर एक जीवन असतं
आताही आहे... पण जीव तर तुच घेऊन गेलीस
आता फक्त एक वन राहिलेलं...
संपतच नाही ....चालतो आहे कधीचा
सुर्यही उगतो तुझाच दिवस घेऊन
रात्रही माझी नाही...चंद्रही माझा नाही...
आहे माझा फक्त ... काळोख प्रत्येक रात्रीचा...


तु असती तर...
फार तर एक घरटं आपलं असतं...
त्या घरट्यामध्ये आपल्या स्वप्नांचं
तोरण मी बांधलं असतं
पण तु नाही म्हणुन काय झालं...
घरटं तर अजुनही तसच आहे ह्या मनामध्ये...
बस एक पाखरु वाट चुकून
कुठेतरी उडून गेलं... मध्येच...!!
अन् मी ही विसरून गेलो
माझ्याच घरट्याचं तुटलेलं तोरण पाहुन ...
कि हे माझचं आहे म्हणुन....
तु असती तर...
फार तर मी स्वत:ला विसरलो नसतो..

Read more...

मैत्रीच्या पलिकड़ल आणि प्रेमाच्या अलिकड़ल नात

Monday, April 19, 2010

....मैत्रीच्या पलिकड़ल आणि प्रेमाच्या अलिकड़ल नात....
मिलालिस तू एक सुन्दर मैत्रिण
आनंद जाला मनाला
जसा होतो पावसाच्या भेटीत धरतीला

फरफटलेले आयुष मज़े तुज्या येण्याने सावरले
होते निवदुंड फ़क्त मनात आधी
आता फुलांचे ताटवे फुलले ...

यशामागे धावताना धरपदलो होतो
अनाथ मी जख्मी मन
दुनियेकडून तुदवलो होतो..

त्यावेळी तूच दिलास मैत्रीचा हाथ
अणि दिलीस लाखमोलाची साथ
तुज्या सहवासात वाढला आत्मविश्वास
आनंदाने घेत जगतो आहे मी आता प्रत्येक श्वास
तुज्यामुलेच मी आज पुन्हा उभा राहिलो
हिर्मुस्लेला मी पुन्हा एकदा फुल्लो

आयुष भर तू खुप केले माज्या साथी
आता मलाही करायचे तुज्यासाठी
उरलेले हे मज़े आयुष आता फ़क्त तुज्या साथी
अयुशाभर मी तुजा
दास बनुन राहिल
तुज्या एक हकेची वाट फ़क्त
हा मित्र तुज्या साथी जिव देऊन जाइल ............ ......... ....

Read more...

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP