लेखणीला पुन्हा एकदा धार.. ⚔️
7 months ago
तुझ्या बरोबर बोलायला,
मन माझे व्याकूळ झाले होते,
डोळे होते पाणावलेले,
पण ओठावर हसू होते
कुणीतरी पाहिजे,
आपल्या वर ही मरणार,
जागे पणी नाही पण,
स्वप्नात तरी झुरणार.
देहभान विसरून तुजाशी बोलताना,
मी माझाच उरत नव्हतो,
मित्रांना बोलायला काय जातेय,
पण खरंच, तेव्हा मी कुणाचाच नव्हतो.
>->-प्रशांत-->
माझ्या बरोबर बोलताना,
तुला जगाचा विसर पडायचा,
पण, आता का? माहित नाही..
तुला माझाच विसर पडतो....
तुझ्या बरोबर बोलताना,
मला जगाचा विसर पडायचा,
पण, आता का? माहित नाही..
मला तुझाच विसर पडतो....
>->-प्रशांत पवार-->
© Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009
Back to TOP