मराठी चारोळ्या

Pages

Showing posts with label बा सी मर्ढेकर. Show all posts
Showing posts with label बा सी मर्ढेकर. Show all posts

खप्पड बसली फिक्कट गाल

Friday, May 28, 2010

खप्पड बसली फिक्कट गाल
तळभिंतीवर
 घेउन जख्खड
मातीची
 ही जुनी झोपडी
आंबट
 मिनिटें चाखित रद्दड.
मध्येच दचकुनि बघते वरती,
अष्टदिशांचा
 सासुरवास;
चंद्रमौळी
 परि बेढब शबरी
क्षण
-बोरांची रचिते रास.
मातीवरती करीत मात;
मिनिटांमधुनी
 काढित व्याधि;
तपकिरि
-पिवळ्या मउ सालीचें
बोर
 गवसतां जरा सुगंधी,
कुरवाळीत तें बोटांनी मउ
मिनिट
 सुवासिक हसते शबरी;
माणुसकीच्या
 दंडकांत अन्
गौऱ्या
 थापित वदे शर्वरीः
येइल का कधी सीतापति ग
चुकून
 तरी पण ह्या वाटेला?
घेइल
 का अन् रुजू करुनी
ह्या
 बोरांच्या नैवेद्याला?
कुठली सीता, कुठला राघव?
पुसे
 खडीचा रस्ता फक्कड;
आणि
 ठेविते गाल झोपडी
तळभिंतीवर
 फिरून खप्पड. 

Read more...

जे अज्ञानांत जन्मले

जे अज्ञानांत जन्मले । आणि अज्ञानांत मेले, 
त्यांस
 देवा तूं धरिलें । काय पोटीं? ॥

का, झालासी निष्ठुर? । दिलें तयांसी अंतर
जन्ममरणांही
 नंतर । विश्वगर्भीं ॥
देह साफल्य पावले । पृथ्वीवरी त्यांचे भलें;
आलें
 काम त्यांनी केलें । आणि गेले ॥
गळे अश्रूंवीण चरबी । तीच अज्ञानाची छबी;
झाले
 ते खत आणि बीं । तुझ्या मळां ॥
आम्ही ज्ञानवंत भागलों । ना पश्चातापें पोळलों;
नाहीं
 कधी हळहळलों । परदुःखें ॥
वेचिलें ज्ञान कण कण । जैसे की वालुका-गण;
झालों
 कोरडे पाषाण । बुद्धिरूपी ॥
आमुची संज्ञा ही दरड । रखरखीत देहापाड,
वरी
 अहंतेचा पहाड । लागलासे ॥
होतां तप्त ही जमीन । नाही अश्रू, नाही घाम;
वांझपोटीस
 इनाम । रूंक्ष काया ! ॥ 

Read more...

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP