आत्मबळ
Saturday, February 26, 2011
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला,
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला II धृ II
अट्टाहास करित जई धर्मधारणी
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणी
अग्नि जाळि मजसी न खड्ग चेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सुटतो
खुळा रिपु I तया स्वयें
मृत्यूचाचि भितिने भिववू मजसि ने II १ II
लोटि हिंस्त्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळी ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य तें
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हला हला I त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवतो ! II २ II
0 comments:
Post a Comment