मराठी चारोळ्या

Pages

"सचिन तेंडुलकर"

Thursday, February 25, 2010

"सचिन तेंडुलकर"
मज सांग तुजसाठी, काय मागू देवापाशी ?देव देतो, जे जे काही , सर्व आहे तुजपाशी ||१|| 
मोरपिस सुयशाचे, आणतोस खेचुनी | शोभते शिरपेचात, ठेवी मानाने खोचुनी ||२||
नाणे फेक जिंको कोणी, तुजसी नसे फरक |डोंगर धावांचे रची, केव्हढा तुझा उरक ||३||
उतरता तू मैदानी, प्रतिस्पर्धी होई खिन्न |फटकेबाजी पाहुनी, प्रेक्षक होती प्रसन्न | |४||
आव्हान शत्रुचेही, लीलया झणी पेलतो |असतोस तू तिथुनी, धाऊनी चेंडू झेलतो ||५||
ठेवल्या जरी कितीही, तुझ्याकङुनी अपेक्षा | देतोस भरभरुनी, तू मोठ्ठा आभाळापेक्षा ||६||
बाधते न तुज कधीही, कोणतीही यशबाधा |निर्लेप निर्विकारी, उरतोस किती साधा ? ||७|| 
ऊर्ध्वगामी गति तुझी, घेतो गगन भरारी | यश कीर्तीची तोरणे, उभारी जगतद्वारी ||८||
हिरा तूची स्वशैलीचा, कोंदणात जङविला | स्वणॉक्षरी इतिहास, तुझा तूची घडविला ||९|| 
लाभले भाग्य तुजला, इतरा नसे इतुके |सांगे उपेंद्र हर्षे, आस्थेने कवतुके ||१०||
झळके क्रिकेट विश्व, ऐसे महान कर्तुत्व |दौडती विजयी अश्व, गर्जती तुझे श्रेष्ठत्व ||११||
आशिष तुजप्रती, थोर माय-पित्यांचा |मिळे पुण्य वरदान, तो स्पर्श देवकरांचा ||१२||

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP