नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा
Wednesday, October 28, 2009
नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा
------------ -------नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा------------ --------- -
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी तेजसूर्य उगवतो मराठीचा
नजरेच्या तीराने ही घायाळ होतो दुश्मन येथे
शिवबाची ज्योत ठेवतो तेवत, बाणा मराठीचा
कीतीही डोंगर फोडले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधतो मनात, हा मान मराठीचा
गरजले सारे जरी घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये
घुमतो आहे आवाज मराठीचा
तेजोमय तलवार तळपते
येथे ललकार मराठीचा
विवेधतेतला नाद
साज मराठीचा
एक चिंगार
मराठीचा
0 comments:
Post a Comment