मराठी चारोळ्या

Pages

विझता विझता स्वतःला....

Thursday, May 6, 2010

झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असे नाही.

असे किती हंगाम शीळ घालत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही.

शास्त्र्याने दडवावा अर्थ, आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवादच करा सांगणारे खूप: नाहीत असे नाही.

असे इमान विकत घेणारी दुकाने पाडयापाडयावर
डोकी गहाण टाकणारे महाभाग नाहीत असेही नाही.

अशा बेईमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वतःला सावरलेच नाही, असेही नाही.
तुझ्या शिवाय जगण्याचा विचार आता करतो .... जीवन

Read more...

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।

Wednesday, May 5, 2010

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।

परोपकाराचीया राशी। उदंड घडती जयाशी।
तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैची ? ।।

यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।

आचारशीळ विचारशीळ। दानशीळ धर्मशीळ।
सर्वज्ञपणें सुशीळ। सकळा ठाई।।

या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।

कित्येक दुष्ट संहारिले। कित्येकास धाक सुटले।
कित्येकास आश्रय जाले। शिवकल्याणराजा।।

-
समर्थ रामदास

Read more...

तुझे माझे प्रेम

Tuesday, May 4, 2010






























Read more...

जेव्हा आभाळ भरून येत





































Read more...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

Monday, May 3, 2010

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

-
सुरेश भट

Read more...

भय इथले संपत नही

भय इथले संपत नही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगावाया

तो बोल मंद हलकासा
आयुष्य स्पर्शुनि गेला
सीतेच्या वनवासातिल
जणु अंगी राघव शेला

स्तोत्रांत इन्द्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे

भय इथले संपत नाही....

Read more...

हंबरून वासराले चाटते जवा गाय


Read more...

Need your help to build the fort.

Name:  Prashant

Message:

नमस्कार,

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून पुन्हा एकदा सर्व मराठी बांधवाना GlobalMarathi.org च्या छत्राखाली एकत्र आणण्यासाठी दर महिन्याला या वेबसाईट वर एक एक दगड रचून किल्ले बांधण्याच्या मोहीमेत आम्ही सहभागी झालो आहोत. शिवनेरी ते रायगड अशा विविध किल्ल्यांचा यात समावेश असेल. १ मे पासून लोकांच्या सहकार्यातून दर महिन्याला नवीन किल्ला उभारण्याच्या मोहिमेत आपल्या मित्र मंडळीना निमंत्रण पाठवून या ऐतिहासिक घटनेत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे.

Click the Following link   or   Copy and paste this link into your browser.

http://www.globalmarathi.com/GlobalMarathi/Login.aspx?Token=FB83C7C28F700353D8F5519B368C76FA9C7E489B45C7BCC2624B3965183C0FD11BF43BEC149B2D5F

Read more...

Need your help to build the fort.

Message:

नमस्कार,

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून पुन्हा एकदा सर्व मराठी बांधवाना GlobalMarathi.org च्या छत्राखाली एकत्र आणण्यासाठी दर महिन्याला या वेबसाईट वर एक एक दगड रचून किल्ले बांधण्याच्या मोहीमेत आम्ही सहभागी झालो आहोत. शिवनेरी ते रायगड अशा विविध किल्ल्यांचा यात समावेश असेल. १ मे पासून लोकांच्या सहकार्यातून दर महिन्याला नवीन किल्ला उभारण्याच्या मोहिमेत आपल्या मित्र मंडळीना निमंत्रण पाठवून या ऐतिहासिक घटनेत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे.

Click the Following link   or   Copy and paste this link into your browser.

http://www.globalmarathi.com/GlobalMarathi/Login.aspx?Token=92DCFD17F3B111B6356D8C4891D5C757FAA65F08DE219888

Read more...

आज तुझी आठवण येत आहे..

Thursday, April 29, 2010

आज तुझी आठवण येत आहे..
आहे मी जिथे उभा
हाथात होता हात तुझा..
आज त्या रस्त्यावर एकटा उभा आहे
आज तुझी आठवण येत आहे..

दाटून आलेले ढग तो रिमझिम पाउस
एका छत्रीत ते जवळीक साधण..
आज एका आडोश्याला मी उभा आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

पहाटेची पहिली किरण
तुझं अलगद येऊन केसांचे पाणी उडवण ..
आज पहाट रात्रीपेक्षा भयाण आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

मधुर चांदण्याची ती रात्र
ऑफिस मधून घरी यायची घाई..
आज दाराचे कुलूप उघडायला घाबरत आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

तुझ्या प्रेमाने सजलेले ते घर
प्रत्येक कोपर्यात तुझाच भास..
आज तुझ्या एका हाकेस आतुर झालो आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

असह्य यातनाच ओझ दिलस
डोळ्यातील अश्रू हृदयातूनी वाहतात..
अखेरचा श्वास तुझ्या कुशीत सोडायचा आहे
आज तुझी आठवण येत आहे..

जीवन मुक्तीच साकड देवाकडे घालतोय
हसत हसत मरण याव याची वाट बघतोय
जवळ तुझ्या आज मी येत आहे..
आज तुझी आठवण येत आहे..आठवण येत आहे...

Read more...

सुख आणि दुख

Tuesday, April 27, 2010

सुख आणि दुख हे रस्त्याचे दोन अलग अलग मार्ग आहेत,
एक सुखा कडे जातो तर दुसरा दु:खा कडे येतो,
पण कोणी कोणत्या मार्गाने जायचे हे दैवच ठरवते.

Read more...

माझी माणसे

Saturday, April 24, 2010

माझी माणसे शोधुन दमलो मी
माझी जात जाणुन फसलो मी

माझी भाषा कळेनाच कुणाला इथे
अनोळख्या जनावरांच्या कळपात घुसलो मी

माणंसातला माणुस नाही ओळखला
माझ्याच आरश्यातल्या प्रतिबिंबाला फसलो मी

भावना अन प्रेमाचा दुष्काळच इथे
आयुष्यभर दगडांतच जगलो मी

कुणाला शिकवायची निती-मुल्ये इथे
संस्कार घेउन राक्षसांत वाढलो मी

माझे भविष्यच अंधुक दिसतय आता
मुडदा होउन वर्तमानातच जगलो मी

यमाच्या रेड्याला म्हैस समजलो
मरताना हसलो अन तिथेसुद्धा फसलो मी
************ ***

 Only RooPESH 

 

Read more...

काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!

नटून थटून आली जेव्हा ती बेस्ट बसमधून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

पाहताच तिला मी एकदम क्लीन बोल्ड झालो…
एप्रिल च्या कडकडीत दुपारी आय ऍम सो कोल्ड झालो!
भूक हरवली, झोप उडाली झालो दिवाना तिज पाहून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

व्हॅलेंटाइन्सला ठरवलं, तिला सांगू मनातली गोष्ट…
पण दुर्भाग्य माझं असं की तिचे भाऊ होते फार धष्टपुष्ट!
गोष्ट राहिली बाजूलाच, आणि आलो मी हनुमान होऊन…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

मी ही हार मानणारा नव्हतो म्हटलं शोधू नवा मार्ग…
तडक जाऊन मग शोधून काढला मी एफवायबीकॉम चा वर्ग!
जे काही पाहिले ते पाहतंच राहिलो डोळे विस्फारून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

विश्वास बसता बसेना की ती वर्गासमोर उभी होती…
एफवाय च्या वर्गाला ती ‘सी प्रोग्रॅमिंग’ शिकवत होती!
जिच्यावर लाईन मारत होतो आलो तिलाच मॅडम म्हणून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!

कि .

Read more...

हवं ते मिळालं की ,

हवं ते मिळालं की ,
बाळ खुश होऊन जातं . .
बाळ गोड गोड हसून
आपल्याला ही खुलवतं ....

हवं ते मिळालं तरी ,
आपण नाखुशच असतो ...
पळत्याच्या पाठीमागे
सारखे धावत असतो....

आनंदाचा क्षण काही
टिकवून ठेवता येत नाही . .
दैवाला दूषण देवून
हव्यास सोडता येत नाही ....

हृदयात डोकावून पाहिले
तर कारुण्य खूप दिसते...
पण तेवढीच जागा ही
आनंदाने व्यापलेली असते....

जावू नये दु:खाने पोळून
की सुखाने खूप हूरळून ...
शांत शांत वाटेल बघा,
दोघांचा समतोल ठेवून ....

Read more...

"मला एक नवीन क्षितीज सापडलंय".

"मला एक नवीन क्षितीज सापडलंय".
होय,
जीथं सूर्य कधी मावळतच नाही
अन काळोखाला अस्तित्वच नाही
जीथं भूतकाळाच वास्तव्यच नाही
अन आठवणींचा प्रश्नच येत नाही..
होय मला . .. ... ....

जीथं सुख सोबत सोडत नाही
अन दुख: कुठचं दिसत नाही
जीथं प्रेमाला सीमाच नाही
अन मत्सराला थाराच नाही ..
होय मला एक .. ... ....

जीथं आपल्या भावनांना कदर आहे
होरपळलेल्या मनाला मायेचा पदर आहे
जिथली नाती बंधनातील नाहीत
तरीसुद्धा अजून ती सांडलेली नाहीत..
होय,मला एक नवीन ... ....

जीथं मला कोणाचीच भिती नाही
अस्तित्व सांगणारी स्वताची सावलीसुद्धा नाही
जीथं कोणताच ऋतू मला लागू नाही
अन उन-पावसाच खेळ माझ्या जीवनातच नाही..
होय,मला एक नवीन क्षितीज ....

जीथं वाटासुद्धा दुहेरी नाहीत
फक्त पुढ चालायचं माघार मात्र नाही
जीथं प्रश्नचिन्ह कुठचं दिसत नाही
उत्तर मिळेपर्यंत प्रश्नच उरत नाही ..
होय,मला एक नवीन क्षितीज सापडलंय"

Read more...

निशब्द-माझी चारोळी

Friday, April 23, 2010

निशब्द  मी  निशब्द  तू ......
निशब्द  जग  हे  सारे ...
निशब्द  राहून  हि  कुठून  आले ......
प्रेमाचे  हे  थंड  गार  वारे  वारे ............

Read more...

आमचा.......? महाराष्ट्र !!! आणि आमची मराठी ....

आमचा.......? महाराष्ट्र !!! आणि आमची मराठी ....

.
.
.

पर राज्यातील कावळा
महाराष्ट्रातील झाडावर आला
काव काव करत विनंती करू लागला
या झाड़ा वरील कावळ्यानी दिला त्याला
.....आसरा...........
आणि आपल्याच ताटातला दिला त्याला चारा

चारा खाऊन तो कावळा धष्ट पुष्ट झाला
वर्षा नंतर गावाकडे जाण्याचा विचार केला
गावाकडे जाउन युक्ती त्यांन केली
जाताना सोबत घेउन जावी फॅमिली
बायका पोरा सकट तो पुन्हा रवाना झाला
आनंदाने भाड्याच्या घरट्यात राहू लागला
बायका पोर कामा मधे साथ त्याला द्यायचे
थोड्या पगारात खुप कष्ट करायचे
अस करता करता कामाचा बोझा
खुपच वाढला .....
मग काय.... मेहुना, मेहुनी, सासु
सासरे, सगळ्या राज्याचा
संसार.... याच झाडावर रंगला

आता त्या कावळ्याला भाड्याच घर नको होत
आपल स्वत हाच असाव अस सारख वाटत होत
मग काय त्यान ...हुशारी केली
महाराष्ट्रतल्या कावळ्याना
थोड़ी लाच दिली
अलिबाग, बदलापुर , कर्जत , कसारा
सुन्दर अशी हवा
थोड़े फार पैसे घेउन तितेच रहावा
ताजी , ताज़ी फळे रोज रोज खावा

बिचारे कावले मस्त पैकी हसले
आणि त्या लबाडाच्या....बोलण्याला लगेच फसले
...हळु हळु बिचारे खुप खुप थकले
बिचारे भुकेने भलतेच मेले
आपल्याच राज्यात आपले हे हाल झाले .........!!

Read more...

तू नसतेस तेव्हा

तू नसतेस तेव्हा
तू नसतेस तेव्हा काय होते
ते लक्षात राहाण कसं शक्य  आहे.....?
कारण ...........
फक्त श्वास सुरु असतो तेव्हा
बाकी सार सार असते बंद
अगदी लक्षात राहाण सुद्धा.............
ह , तू असतेस तेव्हा
काय काय होत असते
ते मात्र राहत लक्षात....... सगळे.........
कारण ,
तेव्हा असते सार धुंद
अगदी श्वास घेणेसुद्धा .............
अरे हो , आठवल
तेच तर सगळे आठवतो मी
तू नसतेस तेव्हा ....

Read more...

विनोद

शिक्षक : राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का ?
राजू : नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.

एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतल.
ते कर्ज तो फेडू न शकल्याने बॅंकेचे अधिकारी ती कार घेऊन गेले.
यावर तो माणूस म्हणाला,"मला माहीत नव्हत,
नाही तर मी लग्नासाठी पण कर्ज घेतल असतं."

काय असते कॉलेज ?
शाळा व लग्न यामधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.:)

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!

निलेश- अरे मला जी मुलगी आवडत होती तिने माझ्याशी लग्न नाही केल रे ...
गौरव - अस का झालं ? पण तू सांगायचं ना कि तुझे काका करोडपती आहेत ते ...
निलेश - सांगितलं ना ... चालू निघाली रे ती, तिने काकाशीच लग्न केलं.. :(

मराठीचा वर्ग सुरू होता
बाईंनी वाक्य सांगितलं,
' समोरून एक खूप सुंदर मुलगी येते आहे.'
या वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करा.'
हात वर करून विन्या लगेच उद्गारला,
' आयला आयटम!!!'

डा.पाटिल गेल्या तीन पिढ्या पासून आमचे फॅमिली डाक्टर आहेत हे तू कसेकाय म्हणतोस ?
कसेकाय म्हंजेकाय माझे वडील आजोबा पंजोबा याना त्यांचे हातून च मरण आले या शिवाय काय पुरावा पाहीजे ?

वडील : बाळा, काय करतो आहेस ?
मुलगा : आज शाळेत सरांनी मारल....
वडील : तू काहीतरी चूक केली असशील
मुलगा : नाहीं मी तर चुप चाप झोपलो होतो. :)

ग्राहक ( चिडून ) : वेटर, चिकन बिर्यानी मध्ये चिकनच नाहीये ...
वेटर : साहेब, गुलाब जामुन मध्ये कोणते गुलाब असते ?:)

बायको - जर मी मेले तर ?
नवरा - मी पण मरून जाइल,
बायको - का ?
नवरा - कधी कधी जास्त आनंदसुद्धा माणुस सहन करू शकत नाही.....:)

Read more...

तु असती तर...

Thursday, April 22, 2010

तु असती तर....
फार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप
भांडता भांडता अचानक
काहितरी भयान शांतता झाली असती
एखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर
परत यावा...! अशी माझी नजर
तुझ्या नजरेला स्पर्शुन परत आली असती
अन् मग हळुच.... तुझ्या तळहातांवर
माझ्या ओठांनी चुंबन फुले ठेवली असती....
अन् मग नकळत.... आपलं भांडण मिटलं असतं....

तु असती तर....
आयुष्यात फार तर एक जीवन असतं
आताही आहे... पण जीव तर तुच घेऊन गेलीस
आता फक्त एक वन राहिलेलं...
संपतच नाही ....चालतो आहे कधीचा
सुर्यही उगतो तुझाच दिवस घेऊन
रात्रही माझी नाही...चंद्रही माझा नाही...
आहे माझा फक्त ... काळोख प्रत्येक रात्रीचा...


तु असती तर...
फार तर एक घरटं आपलं असतं...
त्या घरट्यामध्ये आपल्या स्वप्नांचं
तोरण मी बांधलं असतं
पण तु नाही म्हणुन काय झालं...
घरटं तर अजुनही तसच आहे ह्या मनामध्ये...
बस एक पाखरु वाट चुकून
कुठेतरी उडून गेलं... मध्येच...!!
अन् मी ही विसरून गेलो
माझ्याच घरट्याचं तुटलेलं तोरण पाहुन ...
कि हे माझचं आहे म्हणुन....
तु असती तर...
फार तर मी स्वत:ला विसरलो नसतो..

Read more...

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP