मराठी चारोळ्या

Pages

माझा पाऊस........

Thursday, June 24, 2010


माझा पाऊस........

हा खटयाळ पाऊस वेळी अवेळी 
कुणाच्या सखीला एव्ह्डा पीडलाय 
आसुयेने तो भर पावसात पेटलाय 
त्या....
खटयाळ पावसाची मी सुपारी दिलीय 

ऊनाड़ पावसाने किती धिंगाणा घातला 
येडं लावायची आली पाळी तिकडे प्रेमात 
ब्याँडबाजा वाजवायचा फक्त बाकी राहिला 
माझा....
जीव ऐकून वाचून नुसता येडां खुळा झाला 

माझा पाऊस खिडकी बाहेर आसा 
बेधुंद बेबंध कसा मूसाळधार कोसळतो 
मी मात्र भिजतो आठवणीत तुझ्या 
पाय टाकुन......
टेबलावर घरातच "rum"चा घोट घेतो 

Read more...

पावसात भिजण्याचा आनंद

पावसात भिजण्याचा आनंद 


आज का बरे आभाळ असे काळे कुट्ट दिसतंय , 
सांगा ना तिने केस मोकळे सोडलेत का?

आज वार्याबरोबर एक वेगळाच सुगंध येतोय,
येताना वारा तिच्या केसांना उडवून आला होता का?

आज मातीला का बरे वेगळाच गंध येतोय,
ती आज नंगे पाव मातीवर उतरली आहे का?

आज का हो हवा अशी कुंद कुंद वाटते 
तिने मिटून घेतल्यात का पापण्या तिच्या?

आज बघा ना आभाळ कसे भरून आलंय,
कि तिचे डोळे पुन्हा डबडबलेत आठवणीत कुणाच्या?

आज वेड्या सारखा इतका पाऊस का कोसळतोय,
सांगा ना तिच्या डोळ्यातून कोणी वाहतंय का?

अरेच्या उन्हाचा कवडसा आणि इंद्रधनू कसे काय
पावसात भिजून भेटली का ती सजणाला तिच्या?

नाही हो पाऊस बनून आला साजण तिचा,
मोकळ्या केसातून तिने माळला, वार्यावरती तिने उधळला,
हवेतून तिने सांगितला, डोळ्यातून सांडला, इंद्रधानुतून मांडला
तिच्या मनीचा खेळ सारा

वेडे तुम्ही आम्ही पाऊस पाऊस म्हणून त्यात भिजण्याचा आनंद लुटला

------------ --------- --------- --------- --------- --------
        ★彡●๋ दिप★彡●๋

Read more...

आषाढधारा.

Monday, June 21, 2010


बरसल्या धुवांधार आषाढधारा!
करे मजला धुंदहा थंडगार वारा!
ही बोचरी थंडीसहन रे होईना,
ये ना जवळी तू मला सहारा!
न्हाऊन सारा निसर्ग ताजातवाना,
गारठून मोरानेहीमिट्ला पिसारा!
पहा तू इथे एक जादुच झाली,
नाचुन गातोय हा खळाळता झरा!
धुंदीत संगे नाचन्याची उर्मी मला,
मी एकटी येथे अनतू तिथे बिचारा!
                               प्रल्हाद दुधाळ.

Read more...

तुझ्या माझ्यासवे...

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही,
पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही,
तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही,
मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला सुचवायचा पाऊसही,
कशी भर पावसात आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही,
आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊस ही........
... संदीप खरे ...

Read more...

प्रवासात सगळेच

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो

जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जालायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

जगण्याचे संदर्भ असे क्शणाक्शणाला बदलतात
आणी म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलतात
--

Read more...

तुला विसरणं ...

तुला विसरणं हा

तुला आठवनयाचाच एक बहाणा आहे,
नकोसा आणि केविलवाणा !!!

तुला विसऱ्ण्या इतक
मी तुला आठवलाच नव्हत
फक्त साठवलं होत प्रत्येक श्वासात !!!

तुझी प्रत्येक गोष्ट
मी अगदी डोक्यातून काढून टाकलीय
फक्त मनात रुतून बसलीय
एक्यादया निर्गाठीसारखी !!!
तुझ्याविनाही आयुष्य सुरूच आहे
फक्त माझ 'मी' पण परत दे
जे तुझ्यासोबत आहे.... निरंतरपणे !!!

Read more...

तर मग तुम्ही प्रेमात पडला आहात

Wednesday, June 16, 2010

तर मग तुम्ही प्रेमात पडला आहात

जेव्हा तुम्ही कोणा खास व्यक्ती बरोबर असता.
तुम्ही त्याचाकडे दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता,
पण जेव्हा ती खास व्यक्ती तुमच्या जवळपास नसते.
तेव्हा तुमची नजर त्यालाच शोधत असते.
हो ना .... तर मग तुम्ही प्रेमात पडला आहात .
तुम्हाला हसवणारा कोणीतरी तिथे आहे,
तरी तुमचे लक्ष कोणत्या तरी खास व्यक्तिकडे आसते
तर तुम्ही नक्कीच प्रेमात पडला आहात .

खर तर त्याने खुप आधीच तुम्हाला येण्याचे वर्दी दयाला हवी होती,
पण तुमचा फोन वाजताच नाही,
पण तुम्ही मात्र त्याच्या फोनची आतुरतेने वाट पाहत असता,
तर मग शंकाच नाही तुम्ही नक्कीच प्रेमात पडला आहात .


मेलबोक्स/इनबोक्स मध्ये त्याचे/ तिचे भरपूर मेसेज आहेत
सारखे सारखे भाघावायाचे वाटतात,
क्यापेसिटी संपली तरी ते मेसेज डिलीट करावयाचे वाटत नहीं,
तेव्हा तुम्ही त्यांचा प्रेमात पडला आहात .

"तो/ती फक्त माझा/माझी चांगला/चांगली मित्र/मैत्रिण आहे",
तुम्ही अस सगळ्याना नेहमी सांगत असता,
तरी त्याचे/तिचे विचार टालता येत नाही,
म्हणजे तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला आहात .
हे वाचतानाही मनात कोणीतरी डोकावत नाही ना?
तर. . . तर. . . तर. . .
लाजुन हसू नका, तुम्ही खरोखरच त्यांच्या प्रेमात पडला आहात .

--
Regards,
Sandip

Read more...

सुकलेली फुलं

सुकलेली फुलं
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.. 
मी बोलतच नाही 
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात.. 
तिला कळतच नाही 


तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो.. 
स्तब्ध होऊन 
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते.. 
क्षुब्ध होऊन 

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येत 
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत 

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो 
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो 

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही 
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही 

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं 
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं 

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही 
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही 

ती नाही म्हणेल याची भीती वाटते 
ती नाही म्हणेल याची भीती वाटते 
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं 
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं 

कुणास ठाऊक? 
तिच्याही एखाद्या पुस्तकात 
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील... 

-- 
Regards,
Sandip

Read more...

पहायचे होते मला..

पहायचे होते मला..
तुझ्या डोळ्यांत , माझे प्रतिबिंब..
पहायचे राहून गेले..

ऐकायचे होते मला..
तुझ्या आवाजात , माझे नाव..
ऐकायचे राहून गेले..

अनुभवायचे होते मला..
तुझ्या श्वासांत , माझे श्वास..
अनुभवायचे राहून गेले..

तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे....राहून गेले....

भेटीचे तर होते............ ....फक्त बहाणे ,
मजसाठी तर झाले असते ते , ’ जगणे ’..

तुझ्या डोळ्यांच्या तेजात ,
उजळले असते लक्ष दीप , माझ्या नेत्रांत
जे तेवत राहिले असते , उदास अंधा-या रस्त्यांत..

तुझ्या श्वासांच्या सुगंधात ,
फुलले असते संजीवन प्राण , माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन , श्वास रोखणा-या क्षणांत..

तुझ्या आवाजाच्या मारव्यात ,
गुंजले असते मधुर गीत , माझ्या आत्म्यात
जे देत राहिले असते साद , भग्न एकाकी आयुष्यात..

पण, पण....

एक ’ भेट ’ काय टळली..
अन ' जगायचे ' राहून गेले..

' तुझ्याबरोबर ' जगायचे राहून गेले..



-- 
     Raj Tambe

Read more...

पाऊस नसतोच कधी ..............

Saturday, June 12, 2010

पाऊस नसतोच कधी ..............

पाऊस नसतोच कधी वेडापिसा,
वेडे असतोत आपण,
आपणच करीत असतो त्यावर,
आपल्या स्वप्नांची पखरण.....

पाऊस नसतोच कधी आपला, आपल्यासाठी,
आपणच दिवाणे असतो पावसाचे,
म्हणूनच त्याच्या भरून येण्याला आपण,
मानू लागतो फळ आपल्या नवसाचे.....

पाऊस नसतोच कधी,
आभाळभर गरजणारा, मातीभर पसरणारा,
तो असतो फक्त एक मोर,
आपल्याच धुंदीत पिसारा फुलवून रानभर नाचणारा.....

पाऊस नसतोच कधी आपला मित्र वगैरे,
गृहीत धरतो त्याला उगाचच आपण,
आणि करत जातो त्याच्या भोवती,
आपल्या भावबंधांची गुंफण.....

पाऊस नसतोच कधी आपला सोबती,
आपण उगीचच ऐकवतो त्याला गा-हाणी,
त्याची चूक इतकीच की तो म्हणत नाही कधी,
माझ्यासमोर नकोत असली रडगाणी.....

पाऊस नसतोच कधी डोळ्यातून बरसणारा,
आपल्यालाच असते सवय अतिशयोक्ती करण्याची,
नाहीतर आभाळाला तरी काय गरज होती,
असं आतून गहिवरून येण्याची.....

खरं तर........

पाऊस नसतोच कधी खरा पाऊस,
ते असतं फक्त आपलं म्हणणं,
नाही तर,
त्याला तरी कुठे मान्य आहे,
असं जीव तोडून बरसणं.....

Read more...

पावसात भिजलेल्या चारोळ्या भाग 2

Wednesday, June 9, 2010

दिसायला   मी  काळीसावळी  मुलखाची  लाजरी 
नटणे सजणे  या  भोळीला  ठाऊक  नसता  परी 
तव  नयनांचा  पाऊस अवचित  पडला  अंगावरी 
मोहरले  माझे  मन  वाजते  बासरी
 
 
माझे  दुख  पाहून 
एक  ढग  रडत  होता 
तुमच  आपल  काहीतरीच 
म्हणे  तेव्हा  पाऊस  पडत  होता

 
आला  आला  पाऊस ,
चिंब  भिजले  अंगण 
आला  आला  पाऊस ,
चिंब  भिजले  अंगण 
घसरले  तुजे  पाय .....
अन 
सुजले  तुजे 
ढुंगण ..........

 
तुझ्या  वाटेला  डोळे  लाऊन  बसताना ,
प्रत्येक  क्षणात  विचारांचा  वादळांचा  पाऊस .
डोके  म्हणत  होते  नको  वेडा  होउस ,
पण  मनातून  हाक  येते  नको  दूर  जाउस .

 
पाऊस  एकदाचा  पडून  जातो ,
पावसाचे  दिवस  असले  कि .
आसवांच  तस  नसत ..
ते  पुन्हा  येतात ,
एकदा  डोळे  पुसले  कि .

 
सोनेरी  किरणांच्या  मागून  पडणारा  सोनेरी  पाऊस
हातात  हात  तुझे  नि   माझे , आणि  आपली  भिजण्याची  हौस

 
तिला  स्वप्न  बघायला  आवडत  नाही 
आणि 
मला  स्वप्नात  ती 
तिला  पाऊस  फार  आवडतो 
आणि 
मला  पावसात  ती 
तिला  गप्प  राहायला  आवडते 
आणि 
मला 
बोलताना  ती ...

 
आठवतो  का  आपला  श्वास  जसा ,
एकमेकात  मिसळला  होता ..
भर  दुपारी  रखरखत्या  उन्हात ,
कसा  चांदण्यांचा  पाऊस  कोसळला  होता .

 
अचानक  पाऊस  आल्यावर 
काही  थेंब  तुझ्या  ओठांवर  थांबले 
मग  क्षण  भर  मी  पाहतच  राहिलो 
आणि  आयुष्यात  पहिल्यांदा 
मला  थेंब  व्हावेसे  वाटले

 
पाऊस  पडला  कि  मनाला 
मनापासून  भिजावस  वाटत 
शब्दानाही  मनात  मग 
कविते  साठी  रुजावस  वाटत

 
पाऊस  म्हणजे  खर  सांगतो 
परीक्षा  असते  स्वत :ची  
किती  गोष्टींची  कबुली 
आपण  देत  राहतो  स्वत :शी

 
हल्ली  मी  हि  शिकलोय ,
माझ   माझ  जगायला ,
पाऊस  नसेल  तेव्हा ,
शोवर   खाली  भिजायला .

 
जेव्हा  पाऊस  वादळाचे  गाणे  जोरात  गात  असतो ..
तेव्हा  मी  झाडाखाली  चिंब  भिजत  तुझीच  वाट  पाहत  असतो ..

 
तिच्या  आठवणीचा 
एक  मेघ 
पुन्हा  दाटून  आला ..
डोळ्यांच्या  कडा  मधून  
अश्रूंचा  पाऊस 
पडून  गेला .!

 
एस एम एस   झाला  असेल  थोडा  ओला ,
सेंड केला  आणि  नेमका  पाऊस  आला 
वाचायच्या  आधी 
पुसून  घे  त्याला ,
पण  जरा  जपून  कारण  त्यात  आहे  'मैत्रीचा ' ओलावा

 
मैत्री  1 वारा  बेभान  वाहणारा , 
मैत्री  1 पाऊस  वेडापिसा  कोसळणारा ,
मैत्री  1 मन 
हळुवार  जपणारे ,
आणी  मैत्री  1 अतूट  नाते  हवेहवेसे  वाटणारे ..

 
कधी  न  संपणारे  1 स्वप्न  असावे ,
न  बोलता  ऐकू  येतील  असे  शब्द  असावे ,
उन्हाळ्यात  पाऊस  पडतील  असे  ढग  असावेत ,
न  मागता  साथ  देतील  असे  मित्र  असावे

 
एव्हाना  तिच्या  आठवणीचा  1 मेघ 
पुन्हा  माझ्या  हृदयी  दाटून  आला 
मग  या  नयनाच्या  कडान  मधून 
हळूच  अश्रूंचा  मुसळधार  पाऊस  कधीच  पडून  गेला
 

 
अंधाऱ्या  रात्री  लाईट  हवी  असते ,
पाऊस  पडत  असताना  छत्री  हवी  असते ,
जीवन  जगत  असताना  
तुझ्यासारख्या  मित्राची  साथ  हवी  असते .

Read more...

पाऊस आला !


पाऊस आला !

वार्‍याला पावले थेंबांची घेऊन पाऊस आला !
आकाशी पांखरे ढगांची घेऊन पाऊस आला !

उजाडल्या डोळ्यांकाठी,
तहानल्या ओठांसाठी,
जगण्याचे थेंब चार ताजे घेऊन पाऊस आला !

आतुरश्या काळजांचे,
वाटेकडल्या नजरांचे,
क्षितिजाला रंग काजळाचे घेऊन पाऊस आला !

सरसरत्या लयतालांचे,
झिमझिमत्या झंकारांचे,
धरतीचे स्वप्न मैफलीचे घेऊन पाऊस आला !

हृदयातुन दाटलेला,
अश्रूंतून फाटलेला,
शब्दांना पूर एक वेडा घेऊन पाऊस आला !

Read more...

पावसात भिजलेल्या चारोळ्या भाग १.

कातर वेळचा गार वारा,

तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.

मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.

जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे, 

तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,

पाऊस येतो आणि जातो,

साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.


मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून.

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो......

तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन,
तुझ्या डोळ्यात येऊ,
पाहणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.

पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने.

ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.

तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.

नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर.

पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा......
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा....

रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता.

आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो, 
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो

ओल्या तुझ्या त्या समस. ला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.

माझ्या भिजलेल्या तहानलेल्या पापण्यांना ,
तुझ्याच भावनांचा आधार आहे,
तुझ्या चेहर्या वरच्या भावनांना,
माझ्या भावनांचा पुकार आहे.

Read more...

पुन्हा मी

Monday, June 7, 2010

तुझ्या बरोबर बोलायला,
मन माझे व्याकूळ झाले होते,
डोळे होते पाणावलेले,
पण ओठावर हसू होते

Read more...

पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेछा!!!!

Saturday, June 5, 2010

पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेछा!!!!
आला आला वारासंगे पावसाच्या धारा
पाठवणी करासया निघाल्या सासुरा
नव्या नवतीचं बाईलकाकतं रुप
माखलं गं ऊनंजनू हळदीचा लेप
ओठी हासूपापणीत आसवांचा झरा
आजवरी यांना किती जपलंजपलं
काळजाचं पानी किती शिपलंशिपलं
चेतवून प्राण यांनादिला गं उबारा

Read more...

वाटल नव्हतं

Friday, June 4, 2010

Read more...

गोड पाऊस

Read more...

पावसाच्या संथ धारांमध्ये

पावसाच्या संथ धारांमध्ये
मदनाच्या मंद वाऱ्यामध्ये
मादक गंध तुझ्या शरिराचा
लावी मनाला छंद मिलनाचा.

पाऊस बरसला
सुगंध पसरला
सहवास बहरला
श्वास मोहरला.

पाऊस धारा बरसल्या
मनाच्या तारा जुळाल्या
इंद्रधनुष्य उगवले
त्याने मिलनाचे संकेत दिले.

जसे, ऊनपावसाच्या खेळात
इंद्रधनुष्याची संगत
तसे, रुसव्या फुगव्याशिवाय
येत नाही प्रेमात रंगत.

Mail By
Vaibhav More

Read more...

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP