मराठी चारोळ्या

Pages

निर्णय

Monday, March 29, 2010

निर्णय


Read more...

"सावली‏"

"सावली‏"


कधी ती त्याच्या पायाशी असायची,
कधी पुढे तर कधी मागे,
कधी लहान होवून,तर कधी मोठी बनून,
त्याच्या पुढे मागे असायची,
एकदा तर रात्रीच्या वेळी,

ती खूप भीतीदयक वाटली,
नकोशी वाटली,
तो पळू लागला,
तिचा तिरस्कार करू लागला,
तेव्हा त्याची सावली,
खिन्नपणे हसून त्याला म्हणाली,
"मी कशी दिसण,हे तर फक्त,
प्रकाशकिरणान्चे खेळ आहेत,
सत्य हे आहे,

मी तुझी आहे.
माझ्यापासून दूर जाणे,
केवळ अशक्यच आहे.

Read more...

तुझ्या हातावर जेव्हा पुन्हा मेंहदी लागणार

Saturday, March 27, 2010

स्वप्नातल्या पाव्लान्ना माझ्या
काटेरी पाउलवाट कळलीच नाही ....
दरम्यान महामार्ग होते माझ्या प्रतिक्षेत ओसाड
पण पावले तिकडे वळलीच नाही ...

जो भोगतो या यातना विराहाच्या
एक एक क्षण युगात मोजतो ...
अणि जो करतो प्रेम अफाट
अर्ध्यातच तो ... का संपतो ???

प्रेम जेवढे मी केले तुझ्यावर
तेवढा वेडा कुणीच भेटणार नाही ....
तेल बनून तर सारे जळतील
मात्र वात बनून कुणी पेटणार नाही ....

तुझ्या हातात दुसरयाचे चुडे
तुझे तुलाच नसणार मान्य ...
कारण जाणतेस तू एक सत्य
प्रेम माझे नव्हते सामान्य ...

मरणावर माझ्या देहाच्या
तू जेव्हा रडत येशील ...
हिरव्या बांगडया दुसर्याच्या
पदरा आड़ लपून तोडशील ...

तुझ्या हातावर जेव्हा पुन्हा मेंहदी लागणार
तेव्हा तुला माझे प्रेम कळणार आहे ....
रंग चढावा त्याच्या नावाचा गर्द
म्हणून पूर्वीच्या रंगावर तू जळणार आहे .......

Read more...

सुविचार

Thursday, March 25, 2010






















Read more...

उंटावरचा शहाणा

Read more...

राणीची बाग

Read more...

मेजवानी

Read more...

कुम्भकुर्ण

Read more...

खुर्ची आणि स्टूल

Read more...

गंडू आणि चेंडू


Read more...

दोन परी

Read more...

डोळ्यांची कथा


Read more...

1ndian

Wednesday, March 24, 2010

1ndian

Read more...

बाताराम

Tuesday, March 23, 2010


Read more...

बकासुर

Read more...

आटपाट नगरामध्ये

Read more...

सुख दु:ख.........

Wednesday, March 17, 2010


आयुष्य हे असच असतं,
कधी फुंकर तर कधी वादळ असतं.

कधी सुखाची शाल ओढून,
दु:ख दबकत येत
तर कधी दु:खाचे काटे लावून,
सुख धावत येत.


सुखाचा उपभोग घेताना,
दु:ख कधी आलं हे कळत नाही
अन दु:खाचे काटे टोचत असताना,
सुखाची वाट साहवत नाही.


सुख नेहमी पाहुणा बनून येत,
दोन दिवस राहून लगेच निघून जातं
दु:ख मात्र कायमचा पाहुणा बनून येत,
अन हृदयाला चरे पाडून जातं.


पण आयुष्यात दोन्हीच महत्व तितकच आहे,
एक पोळणार उन तर दुसरी गडद सावली आहे

Read more...

हरियालीचा गुडीपाडवा संदेश

Tuesday, March 16, 2010

Read more...

"स्वागत नववर्षाचे,

"स्वागत नववर्षाचे,
आशा आकांक्षाचे,
सुख समॄद्धीचे,
पडता द्वारी पाऊल गुढीचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रीखंड पुरी
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नववर्ष जावो छान
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आरंभ होई चैत्रमासीचा
गुढ्या तोरणे सण उत्सवाचा
कवळ मुखी घालू गोडाचा
साजरा दिन हो गुढीपाढव्याचा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नवे वर्ष नवी सुरुवात
नव्या यशाची नवी रुजवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
कार्याची घ्या उंच उडी,
उभारा यशोकिर्तीची गुढी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आधी वंदूया लंबोदरा, नमुया प्रभाती दिनकरा
सर्वधारीनाम संवत्सरा, शुभारंभ नववर्षजागरा !
जुन्यातले नवे ठेवुन,सर्वांगी नवपालवी लेऊन
नव्याची ओढ सनातन, पुरवो हे वर्ष नूतन !
साडेतीन मुहुर्तांपैकी एक, गुढीपाडवा सण सुरेख
या मंगलदिनी काही एक, शुभकार्य अवश्य करावे..
येत्या वर्षी नवीन घडूद्या , टाकाऊ ते सारे झडूद्या
मंगलवार्ता कानी पडूद्या , गुढी यशाची नवी चढूद्या.
नववर्षी इतिहास घडवा, कर्तॄत्त्वाचे इमले चढवा
माणसांतले मैत्र वाढवा- सुरुवात आजच...गुढीपाडवा !
सोनपिवळ्या किरणांनी आले नववर्ष
मराठी मन्मनी दाटे नववर्षाचा हर्ष
गुढीपाडव्याच्या सोनपिवळ्या शुभेच्छा!
माझ्या अख्या महाराष्ट्रात आणि सर्वच्या मना मनात
सोनपिवळा स्पर्श
हिरव्या गर्दिला स्रूजनांचा हर्ष
कुणाच्या स्वागता हा सोहळा?
गुढीपाडव्याचा मुहुर्त आगळा,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Read more...

तु असती तर....

Monday, March 15, 2010


फार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप
भांडता भांडता अचानक
काहितरी भयान शांतता झाली असती
एखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर
परत यावा...! अशी माझी नजर 
तुझ्या नजरेला स्पर्शुन परत आली असती
अन् मग हळुच.... तुझ्या तळहातांवर
माझ्या ओठांनी चुंबन फुले ठेवली असती....
अन् मग नकळत.... आपलं भांडण मिटलं असतं....

तु असती तर....
आयुष्यात फार तर एक जीवन असतं
आताही आहे... पण जीव तर तुच घेऊन गेलीस
आता फक्त एक वन राहिलेलं...
संपतच नाही ....चालतो आहे कधीचा
सुर्यही उगतो तुझाच दिवस घेऊन
रात्रही माझी नाही...चंद्रही माझा नाही...
आहे माझा फक्त ... काळोख प्रत्येक रात्रीचा...

तु असती तर...
फार तर एक घरटं आपलं असतं...
त्या घरट्यामध्ये आपल्या स्वप्नांचं
तोरण मी बांधलं असतं
पण तु नाही म्हणुन काय झालं...
घरटं तर अजुनही तसच आहे ह्या मनामध्ये...
बस एक पाखरु वाट चुकून 
कुठेतरी उडून गेलं... मध्येच...!!
अन् मी ही विसरून गेलो
माझ्याच घरट्याचं तुटलेलं तोरण पाहुन ...
कि हे माझचं आहे म्हणुन....
तु असती तर...
फार तर मी स्वत:ला विसरलो नसतो...

Read more...

साहित्यातल्या ध्रुवताऱ्याचं आज अंत्यदर्शन...(श्रद्धांजली)


साहित्यातल्या ध्रुवताऱ्याचं आज अंत्यदर्शन...



ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी साहित्य सहवासमध्ये ठेवण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव साहित्य सहवासमध्ये ठेवण्यात येईल. यानंतर त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात येणार आहे.
कविता, बालसाहित्य, समीक्षा, अनुवाद, अर्वाचीनीकरण अशा विविध प्रांतात हुकुमत गाजवणारे मराठी साहित्याचे महान तपस्वी विंदा करंदीकर यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून गुरुनानक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. विंदांच्या निधनानं साहित्य विश्वावर शोककळा पसरलीय. खऱ्या अर्थानं एखाद्या क्षेत्रात पोकळी निर्माण होणं म्हणजे काय असतं ते आज विंदांच्या जाण्यानं जाणवतय अशा भावपूर्ण शब्दात मान्यवरांनी विदांना श्रद्धांजली वाहिलीय. ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित विंदांच्या हस्ते पुण्याच्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार होतं. मात्र त्याआधीच विंदा आपल्यातून निघून गेल्यानं साहित्यप्रेमींनी दु:ख व्यक्त केलय.  वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. त्याशिवाय कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार, कोणार्क सन्मान, केशवसूत पुरस्कार तसेच विद्यापीठांच्या डी.लिटस् अशा पदव्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक , विरुपिका,
अष्टदर्शने हे त्यांचे विशेष गाजलेले काव्यसंग्रह आहेत. त्यातील अष्टदर्शने या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठनं सन्मानित करण्यात आलं होतं. तर राणीची बाग, एकदा काय झालं, सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी गं परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, हे बालकवितासंग्रह विशेष लोकप्रिय आहेत. विंदा करंदीकर यांच्या निधनानं साहित्य विश्वाची अपरिमित हानी झालीय
विंदांना पुण्यात होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आल होत. २६, २७, आणि २८ मार्चला होणाऱ्या या साहित्य संमेलनाची सुरुवातच विंदांच्या कविता वाचनाने होणार होती. मात्र विंदांच्या निधनाने हे राहून गेल. रविवारी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद् आणि साहित्य संमेलन कार्यकारी मंडळाकडून विंदाना श्रद्धांजली वाहण्यात आली. साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते .

Read more...

मिठी

Saturday, March 13, 2010

मिठी 

सांग असं अर्ध्यावर कुणी तोडतं का नात
पडला ना जो कमी काही, त्यास विश्वास म्हणतात.

तुला एकदाही न वाटले विचारावा खड्सून जाब
मग मी केलेना जे प्रेम ,त्यास माझी व्ययक्तीक बाब म्हणतात.

तुला वाटलेच कधी हसावे तर हास तुझ्यासारखेच गोड
माझ्यासारख्याचे जे होते ना, त्यास घायाळ म्हणतात.

तुला हवा होता देव पूजावया खास
चुकतो ना जो माझ्यासारखा कुणी, त्यास माणूस म्हणतात.

आता तुही बसतेस डोके खुपसून मांडीमध्ये 
पाझरतो ना जो कुणी डोळ्यातून ,त्यास पश्चाताप म्हणतात.

मी नसल्यावरही होतो माझा असल्याचा भास तुला 
कावरी बावरी होतेस ना सारखी, त्यास विरह म्हणतात.

आता धावत ये घडल्या प्रसंगाची ना मानता भीती 
समावशील ना अवघी ज्यात, त्यास मिठी म्हणतात

Read more...

आला पह्यला पाऊस

Friday, March 12, 2010

आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी
आला पाऊस पाऊस
आतां सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी
आला पाऊस पाऊस
आतां धूमधडाख्यानं
घरं लागले गयाले
खारी गेली वाहीसन
आला पाऊस पाऊस
आला लल्‌करी ठोकत
पोरं निंघाले भिजत
दारीं चिल्लाया मारत
आला पाऊस पाऊस
गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडाले घरांत
आतां उगूं दे रे शेतं
आला पाऊस पाऊस
वर्‍हे येऊं दे रे रोपं
आतां फिटली हाऊस
येतां पाऊस पाऊस
पावसाची लागे झडी
आतां खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी
देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयांतले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास

Read more...

पेरनी पेरनी

पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला व्होलगा
पेर्ते व्हा रे पेर्ते व्हा रे
पेरनी पेरनी
आले आभायांत ढग
ढगांत बाजंदी
ईज करे झगमग
पेरनी पेरनी
आभायांत गडगड
बरस बरस
माझ्या उरीं धडधड
पेरनी पेरनी
काढा पांभरी मोघडा
झडीन तो झडो
कव्हा बर्सोती चौघडा
पेरनी पेरनी
आला धरतीचा वास
वाढे पेरनीची
शेतकर्‍या, तुझी आस
पेरनी पेरनी
आतां मिरूग बी सरे
बोलेना व्होलगा
पेर्ते व्हा रे पेर्ते व्हा रे
पेरनी पेरनी
भीज भीज धर्ती माते
बीय बियान्याचे
भरून ठेवले पोते
पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनीं
ढोराची चारनी
कोटी पोटाची भरनी
पेरनी पेरनी
देवा, तुझी रे करनी
दैवाची हेरनी
माझ्या जीवाची झुरनी

Read more...

पिलोक ( प्लेग )

पिलोक पिलोक
आल्या पिलोकाच्या गाठी
उजाडलं गांव
खयामयांमधीं भेटी
पिलोक पिलोक
जीव आला मेटाकुटी
भाईर झोंपड्या
गांवामधीं मसन्‌वटी
पिलोक पिलोक
कशाच्या रे भेठीगांठी !
घरोघरीं दूख
काखाजांगामधीं गांठी
पिलोक पिलोक
आतां नशीबांत ताटी
उचलला रोगी
आन् गांठली करंटी

Read more...

» रगडनी ( मळणी )

केला पीकाचा रे सांठा
जपीसन सर्व्याआधीं
शेत शिवाराचं धन
आतां आलं खयामधीं
खय झालं रे तैयार
सम्दी भूई सारवली
मधी उभारलं मेढ
पात बैलाची चालली
आतां चाल चाल बैला,
पात चाले गरगर
तसे कनूसामधून
दाने येती भरभर
आतां चाल चाल बैला,
आतां चाल भिरभिरा
व्हऊं दे रे कनुसाचा
तुझ्या खुराखाले चुरा
पाय उचल रे बैला,
कर बापा आतां घाई
चालूं दे रे रगडनं
तुझ्या पायाची पुन्याई !
पाय उचलरे बैला,
कनूसाचा कर भूसा
दाने एका एकांतून
पडतील पसा पसा
आतां चाल चाल बैला,
पुढें आली उपननी
वारा चालली रे वाया,
कसा ठेवू मी धरूनी
पात सरली सरली
रगडनी सुरूं झाली
आतां करूं उपननी
झट तिव्हार मांडली
आतां सोडी देल्ही पात
बैलं गेले चार्‍यावरी
डोयापुढें उपननी
जीव माझा वार्‍यावरी
रगडनी रगडनी
देवा, तुझीरे घडनी
दैवा तुझी झगडनी
माझी डोये उघडनी !

Read more...

पोया ( पोळा )

आला आला शेतकर्‍या
पोयाचा रे सन मोठा
हातीं घेईसन वाट्या
आतां शेंदूराले घोटा
आतां बांधा रे तोरनं
सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या
लावा शिंगाले शेंदुर
लावा शेंदूर शिंगाले
शेंव्या घुंगराच्या लावा
गयामधीं बांधा जीला
घंट्या घुंगरू मिरवा
बांधा कवड्याचा गेठा
आंगावर्‍हे झूल छान
माथां रेसमाचे गोंडे
चारी पायांत पैंजन
उठा उठा बह्यनाई,
चुल्हे पेटवा पेटवा
आज बैलाले नीवद
पुरनाच्या पोया ठेवा
वढे नागर वखर
नहीं कष्टाले गनती
पीक शेतकर्‍या हातीं
याच्या जीवावर शेतीं
उभे कामाचे ढिगारे
बैल कामदार बंदा
याले कहीनाथे झूल
दानचार्‍याचाज मिंधा
चुल्हा पेटवा पेटवा
उठा उठा आयाबाया
आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया
खाऊं द्या रे पोटभरी
होऊं द्यारे मगदूल
बशीसनी यायभरी
आज करूं या बागूल
आतां ऐक मनांतलं
माझं येळीचं सांगन
आज पोयाच्या सनाले
माझं येवढं मांगन
कसे बैल कुदाळता
आदाबादीची आवड
वझं शिंगाले बांधतां
बाशिंगाचं डोईजड
नका हेंडालूं बैलाले
माझं ऐका रे जरासं
व्हते आपली हाऊस
आन बैलाले तरास
आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं
बैला, खरा तुझा सन
शेतकर्‍या तुझं रीन !

Read more...

उपननी उपननी

उपननी उपननी
आतां घ्या रे पाट्या हातीं
राहा आतां उपन्याले
उभे तिव्हारीवरती
चाल ये रे ये रे वार्‍या,
ये रे मारोतीच्या बापा
नको देऊं रे गुंगारा
पुर्‍या झाल्या तुझ्या थापा
नही अझून चाहूल
नको पाडूं रे घोरांत
आज निंघाली कोनाची
वार्‍यावरती वरात ?
ये रे वार्‍या घोंघावत
ये रे खयाकडे आधीं
आज कुठें रे शिरला
वासराच्या कानामधी !
भिनभिन आला वारा
कोन कोनाशीं बोलली ?
मन माझं हारखलं
पानं झाडाची हाललीं !
वारा आलारे झन्नाट्या
झाडं झुडपं डोललीं
धरा मदनाच्या पाट्या
खाले पोखरी चालली
देवा, माझी उपननी
तुझ्या पायी इनवनी
दैवा, तुझी सोपवनी
माझ्या जीवाची कारोनी

Read more...

वाटच्या वाटसरा,

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
नशीबीं दगड गोटे
काट्याकुट्याचा धनी
पायाले लागे ठेंचा
आलं डोयाले पानी
वरून तापे ऊन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फोड आली रे पायीं
जानच पडीन रे
तुले लोकाच्या साठीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट
उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखांत
रमव तुझा जीव
धीर धर मनांत
उघडूं नको आतां
तुझ्या झांकल्या मुठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
'माझेज भाऊबंद
धाईसनी येतीन!'
नको धरूं रे आशा
धर एव्हढं ध्यान
तुझ्या पायानें जानं
तुझा तुलेच जीव
लावीन पार आतां
तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यातं झुकीसनी
चुकुं नको रे वाट
दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हातीं
सोडूं नको रे धीर
येवो संकट किती
येऊं दे परचीती
काय तुझ्या ललाटीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

Read more...

माझं इठ्ठल मंदीर

माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर
टाय वाजे खनखन
मुरदुगाची धुन
तठे चाललं भजन
गह्यरी गह्यरीसन
टायकर्‍याचा जमाव
दंगला दंगला
तुकारामाचा अभंग
रंगला रंगला
तुम्ही करा रे भजन
ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस
सुद्ध ठेवा मन
आता सरला अभंग
चालली पावली
'जे जे इठ्ठल रखूमाई
ईठाई माऊली'
शेतामंधी गये घाम
हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी
उभा भक्तीचा हा झेंडा
हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला
'झेंडूला बोवानं'
आतां झाली परदक्षीना
भूईले वंदन
'हेचि दान देगा देवा'
आवरलं भजन
आतां फिरली आरती
भजन गेलं सरी
'बह्यना' देवाचीया दारीं
उभी क्षनभरी

Read more...

व्यक्तिचित्रें-बहिणाबाईं

१.
खटल्याच्या घरामधीं
देखा माझी सग्गी सासू
सदा पोटामधीं मया
तसे डोयामधीं आंसू
हिच्या अंगामधीं देव
सभावानं देवगाय
माले सासरीं मियाली
जशी जल्मदाती माय !

२.
माझी ननद 'कासाई'
हिचा लोभ सर्व्यावरी
रूप देवानं घडलं
जशी इंदराची परी
हिचं सरील नाजुक
चंबेलीच्या फुलावानी
देली सम्रीताच्या घरीं
सोभे राजाचीज रानी !

३.
माझी जेठानी 'पानाई'
कशी मनांतली गोट
हिरीतांत शिरीहारी
तोंडामधीं हरीपाठ
बोले तोंड भरीसनी
तसं हातभरी देनं
काम आंग मोडीसनी
सैपाकांत सुगडीन
भरतार देवध्यानीं
मनीं दुजाभाव नहीं
जसे वाड्यांत सोभती
पांडुरंग रूखमाई !

४.
माझी वाहारी 'सीताई'
हिचं मोठं मन देखा
देल्हा देवानं सभाव
खडीसाखरसारखा
तस रूपबी घडलं
जशी बोरांतली आयी
आन कामामंधी बाकी
त्याले कुठे तोड नहीं
असो सासरी माहेरीं
जशी आंब्याची सावली
झिजे आवघ्याच्यासाठीं
अशी लाखांत माउली !

५.
माझी सासू 'भिवराई'
कसं गंमतीचं बोलनं !
हाशीसन आवघ्याचं
पोट गेलं फुटीसन
नांव ठेये आवघ्याले
करे सर्व्याची नक्कल
हांसवता हांसवता
शिकवते रे अक्कल !

६.
पाहीसनी उंदराले
आंगामधी भरे हींव
चिमाबोय चिंव चिंव
आला बोक्या गेला जीव !
देखीसनी बेंडकोयी
कशी झाली धांवाधांव
आतां डरांव डरांव
आला साप गेला जीव !
देखा देखा 'ठमाबाई'
मोठी बोल्याले आगीन
डोये भोकराच्यावानी
जशी पाहाते वाघीन
कव्हां हाशीखुषीमधीं
आयाबायांत रमते
येतां डोक्यामधीं राग
जशी चढेल घुमते

८.
'भीमा' साजरी वाहारी
हिनं उजयलं घर
अरे वाड्यामंधी वागे
आवघ्याशीं आदबूशीर
आला मिर्गाचा पाऊस
पडे आंगावर्‍हे ईज
पडे धर्तीवर भीमा
लागे शेवटली नीज

९.
'मांगो' बोवाजी तुमचा
लोभ पोरांसोरांवरी
घेता कव्हांबी उचली
पटकन कढ्यावरी
खांद्यावरी आडी काठी
दोन्ही हात काठीवर
वाड्यांतून जाती येती
जसे घालत पाखर

१०.
'गनपत' 'गनपत'
गांवामधी मोतीदाना
याची जबान मोलाची
इमानाले इसरेना
खर्‍यासाठी झगड्याले
याची मोठी रे हिंमत
गनपत गनपत
सर्व्या गांवामधीं पत
आवघ्यालेज लह्यना
नही कोन्हाले पारखा
सग्यसायासाठीं झिजे
झिजे चंदनासारखा.

११.
'भानादाजी' 'भानादाजी'
घरामंधी लिखनार
कर्तेसवरते मोठे
यांच्या हातीं कारभार
अरे हातीं कारभार
गोड सम्द्याशीं बोलनं
डोईवरती पगडी
वानीबाह्यनी चालनं
घरामधीं दबदबा
तसं वागनं तोलाचं
सर्वे लोक देती मान
कसं बोलनं मोलाचं
भाईरूनी येतां घरीं
तांब्याभरी पानी पेल्हे
माझी 'काशी' व्हती तान्ही
तीले घीसनी बसले
तिले ठेवलं रे खाले
छातीमधीं कय आली
अरे कोन्ह्या दुस्मानानं
मूठ दाजीले मारली !

१२.
अरे 'मारोत्या' 'मारोत्या'
तुझं मराठं घरानं
असा कसा झाला तरी
बाटिसनी मुसनूमान
पोरासोरांमधी नाचे
काठी फिरये गर्गर
फेके दगडाचा गोया
फोडे कौल डोक्यावर
आला घरदार सोडी
तुले कशाची फिकीर
तुझ्या कर्मामधीं भीक
झाला दारचा फकीर
आज मोठी एकादशी
नको करूं दारीं गिल्ला !
जाय तुझ्या तक्क्यामधीं
तठी म्हन बिसमिल्ला !

१३.
सदा अंगावर बुरा
डोकं कुंभाराचा आवा
नहीं डोक्यांत अक्कल
पन बुचुबुचु जुवा
नहीं कामांत उरक
खुळबुळते चेंगट
करे आदयआपट
आल अंगांत खेंगटं
कधी कोनाचं ऐकेना
अशी आस्तुरी हाटेल
नहीं कोणाची जरब
भरतार गह्याटेल
नहीं लुगड्याले पानी
वर्स गेले निंघीसन
जशी घरामंधी नांदे
'कुसुंब्याची' घसोटीन
कोन्ही बोल्याच्याच आंघीं
करे बोंबलाबोंबल
हिले जल्म देतां देवा
काय हाताले झुंबलं !

१४.
'धुडाबोय' 'धुडाबोय'
धुडाबोय रे केवढी
म्हनूं नका रे केवढी
भूईरिंगनी एवढी !
एका हातांत काडुक
दुज्या हातांत भाकर
डोक्यामधीं नाकतोडे
हिच्या पायाले चक्कर
हिच्या पायाले चक्कर
तोंडामधीं किरकिर
दोन्ही डोयाले झांजर
नाकामधीं तपकीर
खिजवती सम्देझनं
'धुडाबोय' कोनी 'धुडी'
हिच्या आवतीभंवती
पोराटोराच्या झुंबडी
हिले पाहीसन देवा
जीव पडे भरमांत
कसा 'धुडीले, घडतां
तुझा आंखडला हात !

१५.
आला 'मुनीर, टेसांत
कमेटींतला शिपायी
डोये वट्टारत पाहे
रस्त्यामधली सफाई
आला मुनीर शिपायी
याची खुरटेल दाढी
याच्या हातामधी छडी
आन तोंडामधीं बिडी
याची नजर चेकानी
दोन्हीं बुबुयं कुखडे ?
एक 'आव्हान्याच्याकडे'
एक 'कान्हाकाई' कडे !
आला मुनीर शिपायी
याची पाहीसन छडी
पोरं गडरीवरले
घरामधीं गेले दडी
अशी मुनीर दादाची
सर्व्यावर दहसत
हातीं घेतला झाडना
भंगी पये घाबरत
खेकसनं दमदाटी
याचं काम जातां सरी
मंग मारतो बैठक
'इठू' सोनाराच्या दारीं

१६.
आली मुक्की पिंजारीन
आली कापूस पिंज्याले
हातामधीं धुनुकनी
तोंडीं वटवट चाले
हिले येयेना बोलतां
काय मुक्याचं बोलनं ?
समजनं समजी घ्या
जसं तातीचं वाजनं !

१७.
चाले गान गात गात
'भोजा' फुटका फुटका
जातां येतां वाड्यांतून
सदा करतो वटका
मोठं बोलनं गंमती
सांगे गानं गाईसन
आवघ्याले हांसाळतो
याचं सुरूं सदा गानं !

१८.
'छोटू भय्या' छोटू भय्या'
तुझी कानटोपी लाल
दिसे चाकीवानी तोंड
तुझे थुलथुले गाल
तुझे डोये सदा लाल
त्याच्यांतून गये पानी
तुझ्या नाकाची ठेवन
भज्या- गुलगुल्याच्यावानी
पोट माथनीसारखं
वर्‍हे बोंबीच झांकन
व्होट पोपटाची चोंच
पढे तुयशीरामायन

१९.
'लालू मिय्या' 'लालू मिय्या'
गांवामधी आवलिया
सदा अंगावर बुरा
पावसयांत आंघोया
दाढीमिशाचं जंगल
अंगीं फाटकी गोदडी
हातीं भल्ली मोठी काठी
पाठी चिंध्याची गाठोडी
तुले नही घरदार
सोतामधींच मगन
बारीमास भटकतो
नही खानं नहीं पेनं !

Read more...

बहिणाबाईंच्या ओव्या

भाऊ वाचे पोथी
येऊं दे रे कानांवर
नको भूकू रे कुतर्‍या
तुले काय आलं जरं !
*
कधीं बाप जल्मामधीं
घडूं नहीं ते घडलं
जसं कंगूल्याचं लेंकरू
बंगल्यावरती चढलं !
*
गेला वांकडा तिकडा
दूर सगर दिसला
जसा शेताच्या मधून
साप सर्पटत गेला !
*
कडू बोलतां बोलतां
पुढें कशी नरमली
कडू निंबोयी शेंवटी
पिकीसनी गोड झाली !
*
'फाट आतां टराटर,
नहीं दया तुफानाले
हाले बाभयीचं पान
बोले केयीच्या पानाले !
*
उच्च्या खुज्या जोडप्याची
कशी जमली रे जोड
उगे ताडाखाली जसं
भुईरिंगनीचं झाड !
*
हिरवे हिरवे पानं
लाल फय जशी चोंच
आलं वडाच्या झाडाले
जसं पीक पोपटाचं !
*
पयसाचे लाल फुलं
हिर्वे पानं गेले झडी
इसरले लाल चोंची
मिठ्ठू गेले कुठें उडी ?
*
सोमवती आमावस
कशी आंधारली रात
देल्ही रातांध्याच्या हाती
पेटयेल काडवात !
*
कशी दाखईन रस्ता
आली आंधार्‍याची रात
कसा देईन रे दान
सांग बुझार्‍याचा हात ?
*
तुझी म्हईस ठांगय
नको रुसू लतखोर्‍या
माझी म्हईस दुभती
नको हुसूं रे शेजार्‍या
*
हिच्या तोंडात साकर
आन पोटांत निंबोनी
मोठी आली पट्टवनी
सार्‍या मुल्खाची लभानी !
*
अरे आरदटाकेला
तुले कशाचं हिरीत
तशी निझूर शेताले
काय सांगे बरसात?
*
नागरलं शेत
खूप केली मशागत
पेरल्या मुकन्या
मारे गानं गात गात !
*
फाटी गेलं पांघरून
नको बोचकूं रे चिंध्या
झालं गेलं पार पडी
नको काढूं आतां गिंध्या !
*
तुले परनलं पोरी
झाल्या जल्माच्याज भेटी
दिल्लीचं बिलूबांदर
आनी देलं तुझ्यासाठीं !
*
घरांमधी सर्वे गोरे
तूंच कशी कायीघूस
उज्या जवारींत आलं
जसं कान्हीचं कनूस !
*
माझं उघडे नशीब
पीकं शेतांत दाटलें
तुझे जवून शेजार्‍या
कसे डोये रे फूटले ?
*
रुशी बसे वर माय
तिचा रुसवा रे केवढा ?
"म्हने पापड वाढला
कसा वांकडा तिकडा?"
*
हाया समोरची शाया
पोरं शायेतून आले
हुंदडत हायाकडे
ढोरं पान्यावर गेले
*
पिको आराटी बोराटी
नको शेतामधी बांद
बरी बिरान्याची मया
होऊं नहीं भाऊबंद
*
शेतकर्‍या तुझे हाडं
शेतामधीं रे मुडले
मुडीसनी झाली राख
तापीमाईंत पडले
*
माझी कपीला तान्हेली
कशी पान्यावर गेली
तिले गार्‍यानें गियली
आन् पान्यानेज पेल्ही
*
रस्त्यानं चालली
मायबहीन आपली
मांघे फीरी पाह्यं
पाप्या, धरत्री कापली
*
घाम गायतां शेतांत
शेतकरी तरसला
तव्हां कुठें आभायांत
मेघूराया बरसला !
*
मेहेरूनचा तलाव
नहीं लहान सहान
आज त्यानं भागवली
जयगांवाची तहान
*
अरे, वाहत वाहत
आली नदी 'मेहेरूनी'
तिले म्हनूं नका लेंडी
भागवते धोनं पानी !
*
वटवट्या नारी
तुले वटक्याची सव
तुले देल्हा जल्म
कोन नितातेल देव?
*
वाटेचं वावर
काटीकुपाटीनं बंद
निस्सवली नार
काय करती भाऊबंद ?
*
सावकारा, तुझं मन
मन मोहरी एवढं
तुझं राकेसाचं डाच
तुझं पोट केव्हढं ?
देवा, घेनं जलमनं
खुटेनाज तुझ्या दारीं
तसं देनं न मरनं
सुटेनाज सवसारीं
अरे पांडुरंगा, तुझी
कशी भक्ती करूं सांग ?
तुझ्या रूपापुढे येतं
आड सावकाराचं सोंग
*
डोये लागले आभायीं
मेघा नको रे बरसूं,
केली नजर खालती
माझे शीपडले आंसू
*
भरली येहेर
मोट चाले भराभर
कशाले करतं
कनाचाक कुरकुरं
*
वसांडली मोट
करे धो धो थायन्यांत
हुंदडत पानी
जसं तान्हं पायन्यांत !

Read more...

निसर्ग

Thursday, March 11, 2010

वळीवाचा पाऊस आला
अन शांत निजलेली जागली पाखरं

सरींच्या असंख्य आरश्याचा
सडा पडला जमिनीवर

सुर्यबिंब ही मानुन हार,
मंदावले आहे
नी लपले आहे ढगाआड

न सांगता आलेल्या पाहुण्यासारखे
मी ही केले नाही त्याचे स्वागत
नुसताच वळलोय दुस-या कुशीवर

कुठेतरी वर्षोनवर्षे तप करणा-या
चातकाला मात्र झालाय अगणित आनंद

आम्ही फ़ुके त्रस्त
झालो असलो तरी

एकटा तोच तृप्त आहे

- राज



Read more...

आठवण आली तुझी की

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवसजिथं आपली ओळख झाली.. 
आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतंमग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आ� [...]
आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...
पण तरिही.........

आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी

Read more...

"नि:शब्द प्रीत"


"नि:शब्द प्रीत"

 वळुन पाहिले प्रत्येक वळणावर
कधी तरी तुझी साद येईल...
ना वाटले कधी प्रेम तुझे
इतक्या लवकर कच खाईल...

ना केली मी पर्वा स्व:ताची ,
ना मला तमा या जगाची...

तुझ्या सहवासात आयुष्य जावं
हीच एक इच्छा मज वेडीची...

तु मात्र कधी जाणली नाहीस
किंम्मत त्या प्रेमाची...
मायेच्या नात्यांपुढे जळु दिलीस

स्वप्न आपल्या प्रीतीची..

सांभाळु ना शकलास तु
नात्यांचा हा डोलारा...
ना उरले हाती माझ्या काही,
विस्कटत गेला डाव सारा...


अजुनही वेड्यागत मी
तुझ्यावर प्रेम करते...
सहवासातले क्षण सोबतीला

आयुष्याची नाव हाकते..

जाणते आता कधीच न येणार
तुझी ती प्रेमळ साद...

पण शेवटच्या श्वासापर्यंत असेल
तुझ्या आठवणींशी संवाद...

Read more...

काही ऐकशिल, तर काही सांगशील

Saturday, March 6, 2010


काही ऐकशिल, तर काही सांगशील
बोलणॆ गोड वाट्लॆ तर............ .,
माज़े नाव फ़्रॆड लिस्ट ला टाकशिल
वेळ संपत आली की,
तू निघुन जाशील............
परत तुला मी आठवलो तर
परत माज्याशी चॅट करशील..........
पुन्हा घरी जाउन सर्व विसरुन जाशील
जरा एक ऐकशील?
खरच FRIEND बनणार असशील
तर पट्कन मला रीप्लाय करशील.

जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.
सारी सुखे पदरात आहेत
पण हसुन बघायला वेळ नाहि.
ह्या धावपळीच्या जिवनामधे
जगण्या साठी सुध्धा वेळ नाहि.
मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,
ती मैत्री.
 

Read more...

रोजच्या जीवनात वापरता येतील असे मराठी शब्द

Friday, March 5, 2010

तुम्हाला पासपोर्ट, लिफ्ट अशा शब्दांना पर्यायी मराठी शब्द माहिती आहेत का?
आणि तुमी कधी "माझ्या दुचाकीच्या मागच्या  धावेच्या रबरी नळीतील हवेचे बहिर्गमन झाले आहे.' अशी भन्नाट वाक्यं ऐकली आहेत का? 

रोजच्या जीवनात वापरता येतील असे मराठी शब्द :
१) टेलिफोन - दूरध्वनी . २) टी.व्ही -दूरचित्रवाणी ३) ऑपरेशन - शस्त्रक्रिया

४) हॉस्पिटल -रुग्णालय ५) मोबाईल-भ्रमणध्वनी ६) डिप्लोमा - पदविका
७) प्रोजेक्ट -प्रकल्प ८) पेन-लेखणी  ९) हेड लाईन-ठळक बातम्या १०) मेसेज -संदेश
११) सॉरी -माफ करा १२) रेअक्शन-प्रतिक्रिया १३) ग्लास -पेला १४) फ्रीज -प्रशितानी
१५) कॅन्टीन-उपहारगृह १६) थीम -संकल्पना १७) ब्रोशर -लाघुपुस्तिका
१८) सर्क्युलर -मोड्पत्रक १९) डॉकुमेंटेरी-माहितीपट २०)फिचर फिल्म -प्रधान पट
२१) ई -मैल - ई-टपाल २२)सी डी - चकती २३) चाटींग - गप्पा गोष्टी

२४) की -बोर्ड -कळपाट २५) सर्च ईन्जिन -हुडक्या २६)फाईल - धारिका 
२७) आईस्क्रीम -दुग्धशर्करायुक्त घनगोलगट्टू २८)सिग्नल - ताम्रपट विद्युत पथ

२९) प्लास्टर - अस्तीबंधका ३०) पेन ड्राईव - बोरू वाहक  ३१) ब्ल्यू टूथ - नीलपंखी 
३२) क्रिकेट -लंबदंडगोलपिंड  धरपकड स्पर्धा ३३) सिगारेट - धुम्रपाननलिका

३४) टेबल टेनिस - हरितकाष्ठ मंचकावर दे ठकाठक घे ठकाठक ३५) चहा - कषायपेय 
३६) रेल्वे स्टेशन - अग्निरथ विश्रामधाम .

Read more...

मराठी माणसाला काय येत?

Thursday, March 4, 2010

मराठी माणसाला काय येत?
मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं,मराठी माणसाला स्वातंत्र्यासाठी भर समुद्रात झोकून देता येतं,मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीचीमुहूर्तमेढ रोवता येते
मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहितायेते
मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं
मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो
मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनतायेतं
मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते
मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं
मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.....
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.... .....!!!!!!

Read more...

नटरंग उभा



नटरंग उभा

थुमकिट थुमकिट तदान धुमकिट
नटनागर नट हिमनट पर्वत
उभा उत्तुंग नवा घुमतो मृदंग

पखवाज देत आवाज झनन झंकार
ले‌ऊनी स्त्रीरुप भुलवी नटरंग नटरंग नटरंग

रसिक हो‌ऊ दे दंग, चढू दे
रंग असा खेळाऽऽऽलाऽ
साता जन्माची देवा पुण्या‌ई
लागू दे आज पणाऽऽऽलाऽ

हात जोडतो आज आम्हाला
प्राण तुझा दे सं ऽऽऽगऽ

नटरंग उभा, ललकारी नभा
स्वरताल जाहले दंग (२)

हे, कडकड कडकड बोल बोलती
हुंगर ही तालाची
अरं, छुमछुम छन नन साथ तिला
या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो
हीच ईनंती यावं जी

किरपेचं दान: द्यावं जी
हे यावं जी
किरपेचं दान द्यावं जी
हे यावं जी
किरपेचं दान द्यावं जीऽऽऽऽ , हे !

ईश्वरा जन्म हा दिला
प्रसवली कला, थोर उपकार
तुज चरणी लागली वर्णी
कशी ही करणी करू साकार

मांडला नवा संसार आता
घरदार तुझा दरबार

पेटला असा अंगार
कलेचा ज्वार चढवितो झिंग

नटरंग उभा, ललकारी नभा,
स्वरताल जाहले दंग (२)

हे, कडकड कडकड बोल बोलती
हुंगर ही तालाची
अरं, छुमछुम छन नन साथ तिला
या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो
हीच इनंती यावं जी

किरपेचं दान: द्यावं जी
हे यावं जी
किरपेचं दान द्यावं जी
हे यावं जी
किरपेचं दान द्यावं जीऽऽऽऽ , हे !

Read more...

खेळ मांडला



खेळ मांडला

तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हा‌ई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जा‌ई
तरी देवा सरंना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी ऊधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो ऊरी पेटला ....
खेळ मांडला

सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार, पाठीशी तू ऱ्हा हुबा
ह्यो तुझ्याच ऊंबऱ्यात खेळ मांडला

उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा
न्हा‌ई भेगाळल्या भु‌ईपरी जीनं; अंगार जीवाला जाळी
बळ देई झुंजायाला किरपेची ढाल दे
ईनवीती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळलं शीवार
तरी न्हा‌ई धीर सांडला ... खेळ मांडला

Read more...

डोळे मिटल्यावरही तु दिसतेस!

Tuesday, March 2, 2010

प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!

तु कौलेजला आलीस की
माझी नजर तुझ्यावर खिळते
त्यातुनच पुढचं आयुष्य जगायची
स्फुर्ती मला मिळते!

तु इतकी सुंदर आहेस की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल!

प्रेमे मिळणं ही सुध्दा
एक कला आहे,
पण मी प्रेम मिळवु शकलो नाही
याचं दु:ख मला आहे!

शाळेत मुलीच्या बाजुला बसणं
ही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावं
ही माझी छोटीशि अपेक्षा होती!

चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहमी फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही 
तु दिसतेस!

Read more...

!! बालपणात जायचयं !!


देवा मला परत बालपणात जायचयं,
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं......
पुरणाच्या पोळीसोबत,
आईचं प्रेम होतं,
जखमेचं माझ्या,
काळजावर तिच्या व्रणं होतं
देवा मला परत बालपणात
जायचयंआनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!१!!
शाळेत काही चुकलं तर्‌,
सरांची छडी होती,
’तिच्या’ समोर नाही मारलं,म्हणुन
मनात आनंदाची गुढी होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!२!!
चांदण एकटक पाहण्यासाठी,
निरभ्र मोकळं आकाश होतं,
अन्‌ भरपूर खेळण्यासाठी,
उजाडं असं रान्‌ होतं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!३!!
बाबांच्या मारापुढे,
बत्ती माझी गुल होती,
अन्‌, आसू आईचे नकोत, म्हणुन
हास्यकळी माझी सदा फ़ुलत होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!४!!
लहान भावाचं,
कायमच मागं राहणं,
अन्‌ तो मागे का? म्हणून,
आईच मलाच दम देणं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!५!!
तेव्हा मला खरचं,
काही नाही कळायचं,
जसा छंदच मला,
विनाकारण भांडायच,
भांडलेल्या सर्वानाचं,
सॉरी म्हणुन यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!६!!
मैत्रीण तेव्हाही एक ,
चांगली भेटली होती,
पक्की मैत्री होण्याआधीच ,
’ती’ कुठे बर हरवली होती,
एकदाच तिला फ़क्त, Hi म्हणुन
सरप्राईज द्यायचयं,
निखळ तिचं हसु,
डोळ्यात साठवून घ्यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!७!!
KIRAN ADAM

Read more...

नातं


नातं
तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं..

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात..

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती..

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो..

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील..

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात..
--
अनिल पारठे

Read more...

तिच्या लग्नाची पत्रिका

तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली
दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती
ज्याच्याकडे पदर पसरवून ,’तीमाझ्यासाठी रडली होती,
एक थेम्ब पडला तिथेजिथे आप्तांची नावे दाटली होती
बहुदा माझ्यासोबत फिरताना,तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,
आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं’.., 
यावरही एक थेम्ब पडला, ‘ताई तू जा
काही घसरलेली आसवंलग्नस्थळ दर्शवत होती
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायचीजागा होती,
अहेर आनु नये’ यावरही थोडा ओलावा होता
तिच्या बर्थडे गिफ्ट साठीमी मोबाइलविकला होता…….,
सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली…….,
आज घरी दिसली………… !
 

Read more...

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP