मराठी चारोळ्या

Pages

रोजच्या जीवनात वापरता येतील असे मराठी शब्द

Friday, March 5, 2010

तुम्हाला पासपोर्ट, लिफ्ट अशा शब्दांना पर्यायी मराठी शब्द माहिती आहेत का?
आणि तुमी कधी "माझ्या दुचाकीच्या मागच्या  धावेच्या रबरी नळीतील हवेचे बहिर्गमन झाले आहे.' अशी भन्नाट वाक्यं ऐकली आहेत का? 

रोजच्या जीवनात वापरता येतील असे मराठी शब्द :
१) टेलिफोन - दूरध्वनी . २) टी.व्ही -दूरचित्रवाणी ३) ऑपरेशन - शस्त्रक्रिया

४) हॉस्पिटल -रुग्णालय ५) मोबाईल-भ्रमणध्वनी ६) डिप्लोमा - पदविका
७) प्रोजेक्ट -प्रकल्प ८) पेन-लेखणी  ९) हेड लाईन-ठळक बातम्या १०) मेसेज -संदेश
११) सॉरी -माफ करा १२) रेअक्शन-प्रतिक्रिया १३) ग्लास -पेला १४) फ्रीज -प्रशितानी
१५) कॅन्टीन-उपहारगृह १६) थीम -संकल्पना १७) ब्रोशर -लाघुपुस्तिका
१८) सर्क्युलर -मोड्पत्रक १९) डॉकुमेंटेरी-माहितीपट २०)फिचर फिल्म -प्रधान पट
२१) ई -मैल - ई-टपाल २२)सी डी - चकती २३) चाटींग - गप्पा गोष्टी

२४) की -बोर्ड -कळपाट २५) सर्च ईन्जिन -हुडक्या २६)फाईल - धारिका 
२७) आईस्क्रीम -दुग्धशर्करायुक्त घनगोलगट्टू २८)सिग्नल - ताम्रपट विद्युत पथ

२९) प्लास्टर - अस्तीबंधका ३०) पेन ड्राईव - बोरू वाहक  ३१) ब्ल्यू टूथ - नीलपंखी 
३२) क्रिकेट -लंबदंडगोलपिंड  धरपकड स्पर्धा ३३) सिगारेट - धुम्रपाननलिका

३४) टेबल टेनिस - हरितकाष्ठ मंचकावर दे ठकाठक घे ठकाठक ३५) चहा - कषायपेय 
३६) रेल्वे स्टेशन - अग्निरथ विश्रामधाम .

2 comments:

D D March 5, 2010 at 5:02 PM  
This comment has been removed by the author.
D D March 5, 2010 at 5:05 PM  

पासपोर्ट - पारपत्र,
लिफ्ट - उद्वाहक,
फ्रीज- शीतकपाट,
सर्क्युलर - परिपत्रक,
प्लॅस्टर - लिंपण, अस्थीलेपन,अस्थीपट्टी, मलमपट्टी
क्रिकेट - चेंडूफळी
ईमेल- विपत्र (वि - विद्युतीय),
सीडी - लघुचकती,
सर्च इंजिन - शोधयंत्र,
फाईल - प्रक्रमिका, नस्ती/नास्ती (शासकीय शब्द),
आईस्क्रीम -शीतलक,
ब्ल्यू टूथ- नीलदंत
सिग्नल - संदेशक,
रेल्वे स्टेशन- रेल्वे स्थानक (रेल्वे ला आपण पूर्वी आगगाडी म्हणत होतो.आता त्याला वीजगाडी म्हणू शकतो.)
आणि चहा हा मराठी शब्द आहे ना?

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP