हिंद सुंदरा ती
Saturday, February 26, 2011
हिंद सुंदरा ती, वसुंधरा I धन्य- प्रसवा ती II धृ इई
प्राचीना गायत्री I देवी संधात्री II १ II
भरद्वाज जनका I वसिष्ठ शुकसनका
श्रीगर्गा ऋषिवर्गा I अशां जन्मदात्री II २ II
रामायणकविला I श्रीमत वाल्मिकीला
व्यासाते शिकविते I बोल बोबडे ती II ३ II
रघु नल दाशरथी I धर्मराज नृपती
हे मातर ! हे मातर I वदुनि जिला नमिती II ४ II
गार्गेयी विदुला I सीता द्रौपदीला
झांशीच्या लक्ष्मीला I उद्भव दे पोटी II ५ II
गौतम चैतन्या I गुरु नानकांना
स्तन्य जिचे धन्य करी I त्रिजगन्मान्या ती II ६ II
प्रताप शिव बंदा I श्रीगुरू गोविंदा
संभव दे उद्भव दे I दे जी उत्स्फुर्ती II ७ II
शास्त्रांची सुखनी I सुकलांची नलिनी
सुजल जला, सुफल फला I रुचिर रस-स्त्रवती II ८ II
देइ अशा प्रसवा I जिचा धन्य कुसवा
वसुमति ती दासी कां I क्षण तरि राहो ती ? II ९ II
सूर्यग्रहणाचे I आयुः क्षण साचे
भास्वरची, अमर सदा I रविमंडळदीमी II १० II
शीघ्रचि होइल ती I मुक्ता शुभमूर्ती
स्वतंत्र ती, समर्थ ती I विश्वोद्धरणा ती II ११ II
0 comments:
Post a Comment