अमुचा स्वदेश हिंदुस्थान
Saturday, February 26, 2011
आम्हां हिंदूंचा तो केवळ, होय जीव कीं प्राण II धृ II
देवालय हें पवित्र अपुल्या I देवाचे सुमहान
वाडवडीलांचे हें मंदिर I स्वर्ग मृतांचा जाण
चिल्यापिल्यांची दाई अपुल्या I दुधांचे पान
फुलाफळांनी डवडवलेले I प्रेमाचे उद्यान
सत्ता अपुली मत्ता अपुली I ही रत्नांची खाण
कुणीहिरावुनि नेऊ बघता I रक्षू अर्पुनी प्राण
1 comments:
awesome ....mi marathi ...
Post a Comment