मराठी चारोळ्या

Pages

तिची आठवण अन ती...

Wednesday, August 4, 2010

तिची आठवण अन ती...
 
बागेतल्या रोजच्याच ठिकाणी
रोजच्याच वेळी...
मी तिची वाट बघत होतो
रोजच्याच प्रमाणे तिला
आज ही उशीर झाला होता
आणि रोजच्याच प्रमाणे मी ही
पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत होतो ...

ती येण्याआधी मग, रोजच्याच प्रमाणे
आधी तिची आठवण आली ...
मी ही मग सवयी प्रमाणे ...
गेलो आठवणीच्या संगे..
पुन्हा एकदा..
केली सैर आजवरच्या प्रवासाची.....

आलो जेव्हा भानावारती..
जवळ माझ्या ती बसली होती
डोळे मोठे...नाक फेंदारालेल..
माझ्या मनी डोकावली भीती...

चेहऱ्यावर ढळलेली बट...
डाव्या करंगळीने माघे सारून..
जळजळीत नजर माझ्यावर फेकून...
बोलली ती मला....

"आज काय असेल तो
सोक्ष मोक्ष लावून टाक...
कोण तुला जास्त प्यारी
माझी आठवण की मी स्वतः
या प्रश्नाचे उत्तर तू
लगेच मला देऊन टाक... "

मग स्वतःच रुसली..
मान वळवूनं बसली...
पडलो होतो मी संभ्रमात....
इतक्यात...
तिचीच आठवण...खुदकन हसली...

मग बोललो मी तिला
टाकू नकोस अशी तू
धर्मसंकटात मला....
तुझी अन माझी भेट
फ़क्त काही तासांची असते
तुझी आठवणच मग सखे
नेहमी माझ्या सोबत असते
तुझ्या विरहाला तुझी आठवणच
माझ्या पासून दूर ठेवते...
तू नसताना तुझ्याच रूपाने
अगदी नववधु प्रमाणे सजते...
रात्रभर मग तिच्याच कुशीत मी
तुझीच स्वप्ने वेचीत जातो...
बांधून त्यांच्या तोरणमाळा
मी तव आगमनास झुरतं राहतो...

न कळले तुला जे आजवर
ते सांगतो मी आता..

तुझ्याविना नाही सखे
तुझ्या आठवणींचे अस्तित्व ....
अन तुझ्या आठवणींशिवाय प्रिये
कोण सांगेल तुझे महत्त्व ......

MAIL BY
--
(`*•.¸ (`*•.¸ ¸.•*´) ¸.•* )
..::¨`•*  संजना  *¸.•`¨::..
.(¸.•*(¸.•*´ `*•.¸)*•.¸).

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP